बॉलिवूडमध्ये लग्नसराई! श्रद्धा कपूरही चढणार बोहल्यावर ? वडील शक्ती कपूर यांनी निवडला ‘हा’ मुलगा आणि म्हणाले..!

बॉलिवूडमध्ये लग्नसराई! श्रद्धा कपूरही चढणार बोहल्यावर ? वडील शक्ती कपूर यांनी निवडला ‘हा’ मुलगा आणि म्हणाले..!

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा काळ सुरु झाला आहे. वरुण धवन (Varun Dhawan) याने आपली गर्लफ्रेंड नताशा दलाल हिच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. श्रद्धा कपूरने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात आशिकी 2 ने केली आणि तो चित्रपट चांगला गाजला. श्रद्धा कपूरने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये मोठे स्थान मिळवले यात शंका नाही.

तिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसे, तुमच्या माहितीसाठी सांगतो की श्रद्धा ही बॉलिवूडचा खलनायक शक्ती कपूरची मुलगी आहे आणि ती तिच्या वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये आपले नाव बनवित आहे किंवा आपण असे म्हणू शकतो की तिने नाव कमावले आहे.

मात्र श्रद्धाचे वडील शक्ती कपूर या दोघांच्या नात्याविरूद्ध पूर्णपणे विरोधात होते. तथापि, श्रद्धाने फक्त तिचे मनाचे ऐकले आणि फरहानबरोबर लिव्ह-इन रि’लेशनशि’पमध्ये राहायला सुरुवात केली. मात्र, शक्ति कपूर आपल्या मुलीच्या निर्णयामुळे खूप नाराज होते.

दरम्यान, फरहान आणि श्रद्धा यांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांनी खुप लवकरच ब्रेकअप केला, त्यानंतर श्रद्धा कपूर आपल्या घरी परतली. म्हणजेच, जर आपण थेट म्हटलं तर फरहानपासून विभक्त झाल्यानंतर श्रद्धा अगदी सिंगल होती, पण आजकाल ती पुन्हा कुणाला तरी डेट करत आहे. महत्त्वाचे म्हणजे आजकाल ज्याला श्रद्धा कपूर डेट करत आहे तो अभिनेता नसून छायाचित्रकार आहे, ज्याचे नाव रोहन श्रेष्ठ आहे.

रोहन श्रेष्ठ हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठ यांचा मुलगा असून त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या रोहन श्रेष्ठ हेही फोटोग्राफी क्षेत्रातले एक मोठे नाव बनले आहे. रोहन आणि श्रद्धा एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत असून त्यांनी 2018 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असे म्हटले जाते

त्यानंतर आता हे दोघे लग्न करणार असल्याच्या देखील चर्चा सुरु झाल्या आहेत. वरुण धवन (Varun Dhawan) याच्या लग्नाचा एक फोटो इंस्टाग्रामवर टाकत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर वरुण याने देखील तू देखील लग्न करण्यास तयार असशील असं म्हटलं होतं. त्यामुळे श्रद्धा आणि रोहन लग्न करणार असल्याचा अंदाज बांधला जात होता.

श्रद्धाच्या लग्नाबाबत तिचे वडील आणि अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांनी भाष्य केलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया शी बोलताना शक्ती कपूर यांनी श्रद्धाने कुणाशीही लग्न करण्याचा निर्णय घेतल्यास माझा पाठींबा असल्याचं म्हटलं आहे. तिच्या लग्नासंदसर्भात आणि आयुष्यासंदर्भात निर्णय घेण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे.

तिने तिचा निर्णय मला सांगितल्यास माझा पाठिंबाच असणार असल्याचे यावेळी शक्ती कपूर म्हणाले. केवळ रोहनच नाही तर कुणाबरोबरही तिने लग्न करण्याचा आणि आयुष्य पुढे नेण्याचा निर्णय घेतल्यास तिला माझा पाठिंबा आहे. त्यामुळे आता शक्ती कपूर यांच्या या विधानानंतर श्रद्धा कपूर काय भूमिका घेते याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

रोहनविषयी बोलताना शक्ती यांनी रोहन हा आमच्या घरी लहानपणापासून येत असल्याचे त्यांनी म्हटले. श्रद्धा आणि रोहन चांगले मित्र आहेत परंतु त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे कि नाही याबद्दल मला माहिती नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.

श्रद्धाने मला याबद्दल अजून काहीही सांगितलं नसल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूर बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठशी विवाहबंधनात अडकणार आहे, अशी चर्चा होती. त्यावर श्रद्धा कपूरने जास्त प्रोजेक्टमुळे ती लग्नाबद्दल विचार करत नाही आहे. ही केवळ अफवा असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, श्रद्धा कपूर नुकतीच बागी-3 मध्ये दिसली होती. या चित्रपटात ती टायगर श्रॉफ (Tiger Shroff) बरोबर दिसली होती. त्यानंतर आता ती आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये ती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) बरोबर दिसणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.