बॉलीवूडच्या ‘या’ ७ कलाकारांचे बंगले आहेत की आलिशान राजमहाल? अक्षयच्या बंगल्याची किंमत बघून तोंडात बोटं घालाल.. बघा फोटो

बॉलीवूडच्या ‘या’ ७ कलाकारांचे बंगले आहेत की आलिशान राजमहाल? अक्षयच्या बंगल्याची किंमत बघून तोंडात बोटं घालाल.. बघा फोटो

स्वतःच एक सुंदर- छान घर असावं, असं स्वप्न सगळेच बघत असतात. अनेकजण आपल्या संपूर्ण आयुष्यभराची कमाई, घालवून आपल्या स्वप्नातील सुंदर असं घर बनवतात. काहींचे हे घर लवकर बनते तर, काहींना त्यासाठी अनेक वर्ष लागतात. आजच्या महागड्या अश्या जगामध्ये आपले स्वतःचे घर असणे ही खूप मोठी गोष्ट आहे. खास करुन मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या मोठाल्या शहरात.

मुंबईमध्ये एक छोटेसे घर बनवण्यासाठी कित्येक जण आपले संपूर्ण आयुष्य वेचतात. या मायानगरीमध्ये घर बनवणे आज सर्वसामान्य लोकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. मात्र दुसरीकडे, काही बड्या लोकांचे अगदी आलिशान असे घरं आहेत. यामध्ये बॉलीवूडच्या कलाकारांचे तर मोठाले आणि आलिशान असे बंगले आहेत. भलेमोठे आणि राजवाड्यासारखे बंगले बघून तुम्ही नक्कीच चकित व्हाल.

२. शिल्पा शेट्टी :- बॉलीवूडची सर्वात फिट अभिनेत्री यमी मम्मी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यादोघांच्या बंगल्याची किंमत तब्ब्ल २०० कोटी रुपये आहे. सुमद्राच्या किनाऱ्यावर असणाऱ्या या वीलामधून संध्याकाळ खूपच सुंदर दिसते.

३. अमिताभ बच्चन :-बॉलीवूडच्या बिगबी च्या बंगल्याची किंमत देखील बिग म्हणजेच भलीमोठी आहे. अमिताभ बच्चन यांचे मुंबईमध्ये दोन बंगले आहेत. त्यांचे हे दोन्ही बंगले अत्यंत आलिशान आणि सुंदर आहेत. त्यांच्या कडे जलसा आणि प्रतीक्षा नावाचे दोन बंगले आहेत. जलसा या बंगल्याची किंमत ११२ कोटी तर, प्रतीक्षा या बंगल्याची किंमत १०० कोटी रुपये आहेत. या दोन्ही बंगल्यामधील गार्डन त्यांचे खास आकर्षण आहे. त्यांच्या दोन्ही बंगल्यांनी हिरवळीची चादरच ओढली आहे असं वाटत.

४.आमिर खान :-बॉलीवुड च्या मिस्टर परफेक्शनिस्टचं घर देखील अगदी परफेक्ट आहे. बेला विस्टा अपार्टमेंट मध्ये त्यांचा सुंदर असा फ्लॅट आहे. या फ्लॅटमधून मुंबईचे अगदी सुंदर असे दृश्य बघायला मिळते. आमिरच्या या घराची किंमत ६० कोटी रुपये आहे.

५.जॉन अब्राहम :-बॉलीवूडचा सगळ्यात फिट अभिनेता म्हणून जॉनला ओळखले जातं. त्याच घर म्हणजे सी फेसिंग पेंटहाउस आहे. तिथून मुंबईच्या समुद्राचे खूपच सुंदर दृश्य दिसते. त्याच्या या पेन्टहाऊसची किंमत तब्ब्ल ६०-६५ कोटी रुपये आहे.

६. सैफ अली खान :- बांद्रा च्या फॉर्च्यून हाइट्स येथे सैफ अली खान आपली पत्नी करीना आणि दोन्ही मुलांसोबत राहतो. त्याची पहिली पत्नी आणि दोन्ही मुलं, मात्र मुंबईच्या बांद्रा भागातील एका फ्लॅटमध्ये राहतात. गुजरातमधील पटौदी पैलेस आणि भोपाळ मध्ये सुद्धा त्याची भलीमोठी प्रॉपर्टी आहे. नवाब सैफ अली खानचा पटौदी पैलेस खूपच आलिशान आहे. त्याचा हा पॅलेस सुंदर आहे. त्याच्या केवळ या पॅलेसची किंमत ७५०कोटी रुपये आहे.

७ .शाहरुख खान :- बॉलीवुडच्या बादशाह म्हणजेच किंग खानच घर मन्नत एक आलिशान आणि मोठा बांगला आहे. नशिबाची साथ असेल आणि साथीला मेहनत असेल तर, सर्व स्वप्न पूर्ण होऊ शकतात म्हणून त्याने आपल्या बंगल्याचे नाव मन्नत असं ठेवलं आहे. त्याच्या घरातून समुद्रसपाटीचे सुंदर दृश्य दिसते. अत्यंत सुंदर बंगल्यांपैकी एक म्हणून मन्नत या बंगल्याला ओळखले जाते. शाहरुख खानच्या या बंगल्याची किंमत २०० कोटी रुपये आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *