भलामोठा घुंगट आणि कपाळावर टिकली गावठी दिसणाऱ्या ‘या’ महिलेचे सत्य समोर येताच सर्व गावकऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का..

संस्कृती हा आपल्या देशातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. अजुनही आपल्या देशाने आपली संस्कृती जपली आहे, याचा संपूर्ण जगभरात कौतुक होते. आजच्या एकविसाव्या शतकात देखील, आपल्या देशाने आपले वेगळेपण धर्म संस्कृती सर्वकाही जपले आहे. याचे संपूर्ण जगाला आश्चर्य देखील वाटते.
पण, आज काही अंशी आपल्या देशात देखील, संस्कृतीचा विसर पडत असलेला आपल्याला बघायला मिळत आहे. असे असले तरीही, अनेक जण मोठ्या दिमाखात आपली संस्कृती जपण्यात गौरव समजतात तोच खरा आपल्या देशाचा अभिमान आहे, हे त्रिवार सत्य आहे. अनेक वेळा कोणी भारतीय पोशाखात आपल्यासमोर आले किंवा एखाद्या मोठ्या समारंभात दिसले तर काहीजण त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात.
असे अनेक व्यक्ती आपल्या देशांमध्ये आहेत जे आजही आपल्या सांस्कृतिक पोशाखाचा प्राधान्य देतात. अशाच एका घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर आणि सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंमधून निर्माण झालेल्या भ्रम सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आहे.
एक साधारण दिसणारी महिला, राजस्थानी पोशाखात हातात बांगड्या आणि घुंगट घेऊन आपल्या चिमुकलीला मांडीवर घेऊन संभाळत असलेला फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे. डोक्यावर मोठी टिकली आणि एकूणच पेहराव बघता ती राजस्थानच्या एखाद्या खेड्यातली महिला असावी असा भास होत आहे. एवढेच काय तर डोक्यावर असलेला भलामोठा घुंगट, ती महिला अशिक्षित असेल असाही कयास काही लोकांनी लावला.
पण त्या सर्वांचा अंदाज चुकीचा ठरला. सर्वसाधारण राजस्थानी पोशाखात दिसणारी ती महिला, केवळ उच्च शिक्षित हाच नाही तर एक आयएस ऑफिसर आहे हे सत्य समोर येताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या भारतीय पोशाखाला प्राधान्य देत, एका समारंभासाठी या महिला आयएएस ऑफिसर ने हा राजस्थानी पोशाख घातला होता.
या अधिकारी चे नाव मोनिका यादव असे आहे. मोनिका यांनी 2014मध्ये आई एस ची परीक्षा पास केली होती, आणि सध्या त्या डी एस पीच्या पदावर आहेत. अनेकांनी पाहिले आहे की, एखादा आयएएस अधिकारी जेव्हा आपल्या पदाचा कारभार स्वीकारतो तेव्हा सर्वसामान्य लोकांसोबत व्यवस्थित बोलत देखील नाही.
मात्र तिथेच मोनिका यादव या अगदी आपुलकीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांशी आणि सर्वसामान्य लोकांशी बोलतात. त्यामुळे सगळीकडेच त्यांचे कौतुक होत आहे; त्यांच्या उत्तम कार्य कार्यामुळेच त्यांना आपल्या क्षेत्रातील सर्व प्रथम पुरस्कार देखील मिळाला आहे. मोनिका यांचे वडील देखील आई आर एस अधिकारी आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच सरकारी खात्यांमध्ये काम करून सर्वसामान्यांची मदत करायची ही भावना त्यांच्यामध्ये रुजू झाली होती.
2014मध्ये यूपीएससीची परीक्षा पास केल्यानंतर त्यांनी सुशील यादव या आई एस अधिकाऱ्यांसोबत लग्न केलं. त्यानंतर त्यांना एक छोटीशी चिमुकली देखील झाली. या चिमुकलीला घेऊन अस्सल राजस्थानी पोशाखात त्या बसल्या आहेत आणि तोच फोटो सगळीकडे वायरल होत आहे. कितीही मोठी पोस्ट असेल, कितीही मोठा पदभार असेल; मात्र आपले मूळ आपल्या संस्कार आणि आपली संस्कृती जपणे किती महत्त्वाचे आहे हे अगदी साधारणपणे मोनिकाने मोनिका यांनी सर्वांना दाखवून दिले.