भाभीजी घर पर है मालिकेसाठी 5 महिन्यानंतर नवीन भाभीजीचा शोध पूर्ण, अखेर ‘या’ सुंदर मराठी अभिनेत्रीची मालिकेत होणार एन्ट्री …

भाभीजी घर पर है मालिकेसाठी 5 महिन्यानंतर नवीन भाभीजीचा शोध पूर्ण, अखेर ‘या’ सुंदर मराठी अभिनेत्रीची मालिकेत होणार एन्ट्री …

भाभी जी घर पर है हा लोकप्रिय टेलिव्हिजन शो या शोमधील गोरी मेंम चा शोध पूर्ण झाला आहे. या शोमधील नवीन अनिता भाभीचा शोध पूर्ण झाला आहे. अनिता भाभीची जागा आता एक मराठी अभिनेत्री घेणार आहे. यापूर्वी या शोची अनिता भाभी सौम्या टंडन होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तिने भाभी जी घर पर है मधून निरोप घेतला होता.

तेव्हापासून अनिता भाभी स्क्रीनवर दिसत नव्हती. सौम्या टंडन म्हणाली होती की नोकरी करणे आणि नियमित पैसे कमवणे हे माझ्यासाठी एक्सायटिंग नव्हते. सौम्या म्हणाली की ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेने तिच्या ग्रोथमध्ये खूप योगदान दिले आहे.

निर्मात्यांनी सांगितले की सौम्या टंडन निघून गेल्यानंतर त्यांनी नवीन भाभी बघण्यास सुरुवात केली. यापूर्वी त्यांनी नेहा पेंडसे या शोसाठी संपर्क साधला होता. परंतु त्यावेळी ते साध्य होऊ शकले नाही. मग निर्मात्यांनी आणखी बऱ्याच कलाकारांचा शोध सुरू केला पण त्यांना परफेक्ट असे कोण मिळाले नाही.

मग पाच महिन्यांनंतर निर्मात्यांनी पुन्हा नेहा पेंडसेला संपर्क साधला, यावेळी तिने या शो साठी होकार दिला. आता नेहाने हा करार अंतिम केला आहे. त्याच्याबरोबर तिचे शू’टिंग सुद्धा लवकरच सुरु होणार आहे. नेहा पेंडसे याआधी निर्माते संजय कोहली आणि बिनयफर यांच्याबरोबरही काम करत होती. यापूर्वी मी आय कम इन मॅडम शोमध्ये नेहाने मुख्य भूमिका साकारली होती.

या शोमध्ये ती ऑफिस बॉसच्या भूमिकेत दिसली होती. अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी दोनही ठिकाणी काम केले आहे. बिग बॉस12 मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नेहा जून चित्रपटात देखील दिसणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *