भारतीय क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर येणाऱ्या बायोपिकमध्ये झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री ! अनेक मालिकांमध्ये केलंय काम.

भारतीय क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर येणाऱ्या बायोपिकमध्ये झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री ! अनेक मालिकांमध्ये केलंय काम.

Entertainment

बायोपिक ही आजच्या चित्रपटसृष्टीमधली एक ट्रेंड आहे. माघील काही वर्षांपासून, आपल्याला प्रत्येक वर्षी कमीत कमी २ तरी बायोपिक बघायला मिळतातच. बॉलीवूडमध्ये सिनेमा हिट होण्याचा हा एक सोपा फंडा आहे. शिवाय, आवडत्या खेळाडूंबद्दल, नेत्याबद्दल, कलाकारांबद्दल किंवा दिग्ग्ज व्यक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच तैयार असतात.

त्यामुळे त्या खास व्यक्तींबद्दल बायोपिक बनवले जातात. आजपर्यंत अनेक खेळाडूंचे बायोपिक बॉलीवूडमध्ये बनवण्यात आले आहेत. भारताला वर्ल्ड कप मिळवून देण्यामध्ये खारीचा वाटा उचलणाऱ्या एम एस धोनीच्या बायोपिकने शंभर कोटीहून अधिकचा बिझनेस केला होता. त्याआधी, ऑलीम्पिकच्या खेळात मेडल पटकवणारी बॉक्सर मेरी कॉमच्या बायोपिकमध्ये प्रियांका चोप्राने काम केले होते.

मेरी कॉमच्या बायोपिकने देखील चांगलीच कमाई केली होती. त्यानंतर अनेक खेळाडूंवर आधारित बायोपिक बॉलीवूडमध्ये बनवण्यात आले आणि त्या सिनेमांनी भरगोस कमाई देखील केली. नुकतंच भारताचे सर्वोच्च नागरी सन्मानांचा वितरण समांरभ पार पडला. यामध्ये अनेक खेळाडूंना देखील सन्मानित करण्यात आले.

त्यापैकी क्रिकेटपटू मिताली राज यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रिकेट या खेळाला सुरुवातीपासूनच, पुरुषांचा खेळ म्हणून ओळखले जाते. पुरुषांच्या या खेळामध्ये महिलांचे काय काम, असा प्रश्न आजही विचारला जातो. त्या सर्वांना उत्तर म्हणून मिताली राज यांच्याकडे बघितले जाते. भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व, मिताली राज यांनी अनेक वर्ष केलं आहे.

त्यांनी आपल्या खेळाने नेहमीच सगळीकडे कौतुक कमवले आहे. त्यांचा खेळ भल्याभल्या पुरुष क्रिकेटपटूंना माघे सोडेल असा आहे. त्यामुळे तर मिताली राज यांचा भलामोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर देखील मिताली राज यांचा मोठा चाहतावर्ग आहे.हे सर्व लक्षात घेता आता, मिताली राज यांच्यावर एक बायोपिक लवकरच बनणार आहे.

या बायोपिक बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. तापसी पन्नू या बायोपिकमध्ये काम करणार आहे. ‘शाबास मिथू’ असं तिच्या बायोपिकचे नाव असणार आहे. फेब्रुवारी महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याच सांगितलं जात आहे. तापसीने मितालीची भूमिका साकारण्यासाठी तैयारी देखील सुरु केली आहे. क्रिकेट सारख्या क्षेत्रात प्रवेश करणे आणि त्यामध्ये कीर्ती मिळवणे एका सर्वसाधारण मुलींसाठी साहजिकच खूप मोठी गोष्ट आहे.

त्यासाठी तिला किती संघर्ष करावा लागला, किती अडचणींचा सामना करावा लागला हे सर्व अगदी बारकाईने या सिनेमामध्ये दाखवण्यात येणार आहे. तापसी सध्या, मिताली राज यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेत आहे. याच सिनेमाच्या बाबतीत अजून एन मोठी बातमी समोर आली आहे. मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे देखील या सिनेमामध्ये झळकणार आहे. मराठी मालिका विश्वामधील तितिक्षा मोठं आणि लोकप्रिय नाव आहे.

कन्यादान आणि सरस्वती या मालिकांमधून तितिक्षा तावडेने काम केले होते. तितिक्षाचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. या सिनेमामध्ये ती नक्की कोणती भूमिका साकारणार आहे, याबद्दलचा कोणताही खुलासा अद्याप झालेला नाहीये. मात्र, याबद्दलची माहिती तिने स्वतः दिली आहे. तिने आपल्या सोशल याबद्दलची माहिती दिली. आणि त्यानंतर तिच्या चाहत्यांनी, या बायोपिकसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *