मराठी चित्रपट श्रुष्टीवर पसरली शोककळा, ‘अग बाई सासूबाई’ मालिकेतील ‘या’ 84 वर्षीय अभिनेत्याचे नि’धन…

मराठी चित्रपट श्रुष्टीवर पसरली शोककळा, ‘अग बाई सासूबाई’ मालिकेतील ‘या’ 84 वर्षीय अभिनेत्याचे नि’धन…

मराठी रंगभूमीवर असे फार कमी कलाकार आहेत की, ज्यांचा आवाज हा अतिशय बहारदार आणि भारदस्त आहे. यामध्ये नाना पाटेकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नाना पाटेकर यांचा आवाज हा अतिशय भारदस्त आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत देखील राजा मुराद या ज्येष्ठ अभिनेत्याचा आवाज असाच भारदस्त आहे.

आपल्या आवाजामुळे त्यांनी स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. आम्ही आपल्याला ज्येष्ठ अभिनेते रवि पटवर्धन यांच्या बाबत माहिती देणार आहोत. रवी पटवर्धन यांचा आवाज देखील असाच भारदस्त होता. रवी पटवर्धन यांचे रविवारी नि’ध’न झालेले आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अ’खेरचा श्वा’स घेतला आहे.

ज्यावेळी मराठी चित्रपट सृष्टी मध्ये कोणीही काम करायला धजत नाही, त्यावेळेस रवी पटवर्धन यांनी आपल्या भूमिकांमधून वेगळी छाप सोडली होती. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत खूपच मागणी होती. आपल्या झुपकेदार मिश्या यामुळे ते खूपच परिचित होते. भारदस्त शरीरयष्टी आणि उंचेपुरे असल्यामुळे त्यांना सर्वत्र चांगली अशी ओळख होती.

तसेच त्यांचा आवाज अतिशय कणखर आणि भारदस्त होता. वयाच्या ऐंशीव्या वर्षी देखील ती काम करत होते.रवि पटवर्धन यांनी सुरुवातीला 1974 मध्ये रत्नाकर मतकरी यांच्यासोबत काम केले होते. मतकरी यांच्यासोबत त्यांनी आरण्यक या नाटकात काम केले होते. या नाटकात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती.

मृ’त्यू’च्या आधी देखील ती हीच भूमिका साकारत होते. में’दूची स्मरणशक्ती वाढावी आणि कार्यक्षमता वाढावी म्हणून श्याम मानव यांच्याकडून त्यांनी संमोहन विद्या देखील शिकून घेतली होती. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत नाटकात काम करत होते. साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. तसेच त्यांना अनेक व्या’धीं’नी ग्रा’सले होते.

मात्र, त्यावर देखील त्यांनी मात केली होती. त्यांनी याचादेखील अभ्यास केला होता आणि अनेकांवर उपचार देखील केले होते. रवि पटवर्धन हे मुंबईच्या रिझर्व बँकेत नोकरीला होते. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेतील सातशे श्लोक पाठ केले होते, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांना सर्वजण आदराने पाहत होते.

1944 मध्ये झालेल्या नाट्य संमेलनात मध्ये बालगंधर्व हे अध्यक्षस्थानी होते तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. या वेळी रवी पटवर्धन यांनी पहिल्यांदा भूमिका केली होती. त्यावेळी त्यांचे वय केवळ साडेसहा वर्षे होते. छोट्या पडद्यावर म्हणजेच अनेक मालिकांमधून देखील त्यांनी काम केले होते.

सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या अग बाई सासुबाई या मालिकेत देखील ते काम करत होते. त्याचे आजोबा त्यांना दाखवण्यात आलेली आहे. अतिशय कडक असा स्वभाव त्यांचा दाखवलेला आहे. आजवर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गावचा पाटील किंवा पोलीस आयुक्त अशा भूमिका साकारून सर्वांचेच मन जिंकलेली आहेत.

काही चित्रपटांमध्ये वडिलांच्या भूमिका देखील ते दिसले आहेत. रवी पटवर्धन यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या नि’धनाने मराठी चित्रपटसृष्टीचे खूप नु’कसान झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *