मलायकाचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाली ‘हे’ 3 गुण असलेल्या पुरुषांकडेच मी जास्त आकर्षित होते…

मलायकाचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाली ‘हे’ 3 गुण असलेल्या पुरुषांकडेच मी जास्त आकर्षित होते…

मलायका अरोरा बॉलीवूडमधील एक मोठं नाव आहे. केवळ बॉलीवूडचं नाही तर संपूर्ण ग्लॅमरस जगातील मोठं नाव म्हणायला हरकत नाही. मलायका अरोरा, आपल्या देशातील सर्वोत्तम मॉडेल्सपैकी एक आहे. मलायका आपल्या करियरच्या सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. केवळ आपल्या पॉकेट मनीसाठी मलायकाने मॉडेलिंगची सुरुवात केली होती.

आणि केवळ आवड म्हणून सुरु केललं काम कधी तीच प्रोफेशन बनलं हे तिला देखील ठाऊक नाही, असं ती म्हणते. मॉडेलिंग सोबतच तिने अनेक, म्युझिक अल्बममध्ये देखील काम केले होते. त्यातूनच तिला नवी ओळख मिळाली होती. तिचे अनेक गाणे सुपरहिट ठरले होते, मात्र गोरी नाल इष्क मिठा या गाण्याने तिला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली.

मालयकाचे लग्न बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या कुटुंबांपैकी एका कुटुंबामध्ये म्हणजेच, सलीम खान यांच्या मुलासोबत झालं होत. मात्र असं असलं तरीही, तिने आपली वेगळी ओळख कायमच टिकवून ठेवली होती. तिचे हेच वेगळेपण तिच्या चाहत्यांना कायमच आवडते. वयाच्या चाळीशीमध्ये असताना देखील तिचा फिटनेस एखाद्या नवीन आणि तरुण अभिनेत्रीला लाजवेल असा आहे.

तिच्या फिटनेसचे, संपूर्ण देशात असंख्य चाहते आहेत. त्यामुळेच आजही अनेक मोठाल्या ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीमध्ये, मलायका दिसते. त्याचबरोबर अनेक मोठाल्या डिझायनर्स आणि फोटोग्राफर्सची ती आवडती मॉडेल आहे. म्हणूनच,एमटीव्ही वर येणार सुपरमॉडेल ऑफ द इयर या रियालिटी शोची ती जज आहे.

माघील जवळपास ३-४ वर्षांपासून हा शो सुरु आहे. मॉडेल बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या मुलींसाठी हा शो एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. म्हणूनच हा शो चांगलाच चर्चेत आहे. याच शोमध्ये प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण देखील जज आहे. नुकतंच, मॉडेल्सने मिलिंदसोबत आपले फोटोशूट पूर्ण केले.

त्याचवेळी, मिलिंदने मालयकाला तिच्या मेल फॅन्सच्या मनात असलेला सर्वात मोठा प्रश्न विचारला. त्याने विचारले की,’मलायका तुझे असंख्य जे मेल चाहते आहेत, इन्कलुडींग मी, आम्हाला जाणून घ्यायच आहे की पुरुषांमध्ये तुला कोणती गोष्ट सर्वात जास्त आकर्षित वाटते.’ यावर थोडं लाजतच मालयकाने उत्तर दिले,

‘दाढी नसलेला माणूस मला आवडत नाही, त्याला दाढी तर असलीच पाहिजे. ज्याला फ्लर्ट करता येत असेल. त्यासोबत तो एक चांगला कि’सर असला पाहिजे.’ तिच्या उत्तरानंतर संपूर्ण सोशल मीडियावर त्याबद्दलच चर्चा सुरु आहे. तिचे आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरचे फोटो शेअर करत, हा जगातील सगळ्यात बेस्ट आणि लकी कि’सर आहे, असे म्हणत नेटकरी कमेंट्स करत आहेत.

मलायका आणि अर्जुन दोघेही, कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामुळे, काही नेटकरी थेट त्या दोघांना टॅग करत कमेंट करत आहेत. त्यांनी काहीच वर्षांपूर्वी आपल्या नात्याचा खुलासा केला होता. मात्र, मलायकच्या अनेक मेल चाहत्यांनी अर्जुनाचा आता आपल्याला हेवा वाटत असे कमेंट देखील केले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *