महागडे मॉल बंद असल्यामुळे बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनवर आली रस्त्यावर शॉपिंग करण्याची वेळ, पहा सारा अली खान देखील दिसली ठेल्यावर…

महागडे मॉल बंद असल्यामुळे बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनवर आली रस्त्यावर शॉपिंग करण्याची वेळ, पहा सारा अली खान देखील दिसली ठेल्यावर…

बॉलिवूडचे स्टार्स बद्धल कोणीही विचार असाच करतात की त्यांची कोणतीही खरेदी असेल तर मोठ्या मोठ्या मॉल किंवा शोरूम मध्येच असणार. होय कारण असा विचार करणे साहजिकच आहेत. कारण ज्यांची त्यांची आवड निवड असते की खरेदि कुठे आणि कशी करायची. अगदी सर्वसामान्य खरेदी साठी देखील असे स्टार्स मॉल किंवा मोठ्या शोरूमचे उंबरठे झिजवतात.

बॉलिवूडच्या स्टार्स च्या खरेदी बद्धल बोलायचं झालं तर त्यांची प्रत्येक वस्तूची खरेदी ही ब्रँडेडच असते. साहजिकच पैसे मुबलक उपलब्ध असतील तर कोणीही ही अशीच खरेदी करतात. अगदी जे स्टार्स नसून देखील ज्यांच्याकडे मुबलक पैसे खर्च करण्यासाठी उपलब्ध असतात त्यांना देखील मोठ्या मोठ्या मॉल्स किंवा शोरूम मधून ब्रँडेड खरेदी करणे आवडते.

परंतु सर्वसामान्य माणूस ज्याचे जीवन तो हातावर जगत असतो त्यांना असली खरेदी क्वचित बघायला मिळते. बॉलिवूड स्टार्सच्या कपड्यांपासून ते शूज आणि बॅगपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर सर्वांचे डोळे खिळलेले असतात. म्हणून ते सहसा महागडे ब्रांड वापरतात, ज्याची किंमत लाखोमध्ये देखील असते. परंतु काही अपवादात्मक बॉलिवूड स्टार्स असे देखील आहेत की ते सुद्धा स्ट्रीट शॉपिंग करत असतात.

आणि अश्या वेळेस त्या स्टार्सचे चाहते अनेकदा त्यांच्याबद्दल विचार देखील करतात. तर चला आज आपण अश्याच काही स्टार्स बद्धल जाणून घेणार आहोत की ते पाहून तुम्हालाही कळेल की बॉलिवूडमधील बर्‍याच कलाकारांना रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या दुकानातून खरेदी करणे देखील आवडते.

बॉलीवूडच्या स्टार्स पैकी जाह्नवी कपूर आणि ईशान खट्टर एकत्र दिल्लीमध्ये स्पॉट झाले. त्यावेळी त्यांना स्पॉट केले गेले ते कोणत्याही मॉल मध्ये नाही तर रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या छोट्या दुकानात ते खरेदीसाठी आलेले चाहत्यांनी बघितले. त्यावेळेस चाहते देखील हेच बघत होते की नेमकं हे स्टार्स काय खरेदी करण्यास स्ट्रीट वरील दुकानात आलेले आहेत. ‘धडक’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोन्ही कलाकार दिल्लीत आले होते, त्यादरम्यान दोघांनाही एकत्र पाहिले गेले होते. दोघेही दिल्लीच्या जनपथ मार्केटमध्ये खरेदी करताना चाहत्याना दिसले होते.

बोकीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी सारा अली खान आपली आई अमृता सिंगसोबत हैदराबादमध्ये स्ट्रीट शॉपिंग करताना दिसली होती. ईदच्या निमित्ताने सारा हैदराबादच्या रस्त्यावर दिसली होती. चाहत्यांनी देखील तेथे त्यावेळेस गर्दी केली होती. यावरून असा अंदाज लावता येऊ शकतो की साराला स्ट्रीट शॉपिंग करण्यास देखील आवडते. याशिवाय ती वाराणसीत बांगड्या खरेदी करतानाही सारा अली खान दिसून आली होती.

कॅटरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर खरेदीसाठी दिल्लीच्या जनपथ मार्केटमध्ये दाखल झाले होते. ‘फितूर’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या संदर्भात दोघेही दिल्लीत आले होते. यावेळी कतरिना आणि आदित्यला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.

आयुष्मान खुराना दिल्लीतील मॉल मध्ये नाही तर एका प्रसिद्ध दिल्ली हाटमध्ये पोहोचला होता. जिथे तो शूजच्या दुकानात चाहत्यांना दिसला होता. त्यावेळी तिथेही चाहत्यांनी गर्दी करून मोबाईल मध्ये फोटो देखील घेतले होते. आयुष्मानचे तेव्हा दिल्लीत आपल्या ‘बरेली की बर्फी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *