महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला सोनू सूद, अशा प्रकारे करतोय मदत…

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला सोनू सूद, अशा प्रकारे करतोय मदत…

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर भाग म्हणून कोकणाची ओळख आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर जगभरात, कोकणच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक केले जाते. त्यासाठी संपूर्ण जगात दरवर्षी अनेक पर्यटक, सुट्टीसाठी आणि निसर्गाच्या सन्निधायत राहण्याचा आनंद घेणयासाठी येतच असतात. माघील जवळपास दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, येथील बाहेरील देशातील पर्यटकांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.

मात्र, तरीही देशातून अनेक पर्यटकांनी मधले काही महिने तिथे हजेरी लावलीच होती. एरव्ही अतिसुंदर असणाऱ्या कोकणची अवस्था, अतिवृष्टी आणि महापुरामुळे अगदी भ’यान’क आणि द’यनी’य झाली आहे. गावेच्या गवे, कुटुंब उ’ध्वस्त झाली आहेत. संसार उघड्यावर आलाय आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

अश्यातच अनेक नेते मंडळी कोकणचा दौरा करत त्यांना दिलासा देत आहेत. माघील आठवड्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या भागाचा दौरा केला आणि सरकारची जबाबदारी स्वीकारत नागरिकांना दिलासा दिला. कोकणसह, कोल्हापूर, सांगली, या भागाला महापुराने आपल्या वि’ळाख्यात अ’डकवले. येथे देखील जनसामान्यांचे भरपूर नु’कसान झाले.

अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि दरड दु’र्घटनेत रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मोठं नुकसान झालं. सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूराने कहर केला आहे. सोनू सूदने आता पूरग्रस्त भागातील गावक-यांना मदतीचा हात दिला आहे. अनेक गावात मूलभूत गरजा मिळत नाहीत त्यांना मदत करत आहे. सोनू चिपळूण, महाड आणि इतर अनेक अंतर्गत भागात मदत पॅकेज पाठवणार आहे.

त्याबद्दल बोलताना सोनू सूद म्हणतो, “ही गावे पुरामुळे खूपच प्रभावित झाली आहेत आणि ती सर्व प्रमुख महामार्गांपासून 20-30 किलोमीटर दूर आहेत. त्यामुळे तेथे मदत साहित्य पोहोचलेले नाही. आम्ही या गावांच्या सरपंचांशी आधीच बोललो आहोत. मूलभूत गरजा जसे भांडी, कपडे आणि अगदी खाद्यपदार्थ सर्व पाठवले जात आहेत. कुटुंबांना वैयक्तिकरित्या वितरित करण्यासाठी माझी टीम स्वतः तिथे उपस्थित असणार आहे. अन्नधान्याचे काही ट्रक उद्या येतील आणि आणखी काही एक दिवसानंतर येतील.

महामार्गालगत बरीच मदत सामग्री आधीच पोहचली आहे, परंतु आतील गावांना अजूनही आवश्यक गोष्टी मिळत नाहीत. सोनू आणि त्याची टीम या आतील गावांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे.क्षेत्रपाल, रुद्राणी, दोंडाशी आणि इतर अनेक गावांना मदत साहित्य मिळणार आहे. हे मदत साहित्य संपूर्ण प्रदेशातील 1000 हून अधिक घरांना पुरवले जाईल आणि मदत साहित्याचा दुसरा ट्रक 4 दिवसात गावांमध्ये पोहोचेल.

या गावकऱ्यांना पुरेसे मदत साहित्य वितरित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे जेणेकरून ते एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे राहू शकतील. सूद चॅरिटी फाऊंडेशनची टीम प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या गरजू लोकांची मदत करण्यासाठी आपणही प्रयत्न करू या.कोरोनाकाळापासून सुरु झालेले सोनू सूदचे मदत कार्य आजपर्यंत अविरत सुरु आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *