“माझ्या बहिणीपासून दूर रहा” जेव्हा युवराजने ‘या’ खेळाडूला दिली होती धमकी..!

“माझ्या बहिणीपासून दूर रहा” जेव्हा युवराजने ‘या’ खेळाडूला दिली होती धमकी..!

रक्षाबंधन हा आपल्या देशातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या सणांपैकी एका आहे. भावा बहिणीच्या नात्याला मजबूत बनवणारा हा सॅन संपूर्ण देशात मोठ्या उत्सहाने आणि प्रेमाने साजरा केला जातो. या सणाचे आपले वेगळे महत्व आहे. हा सण, केवळ रक्ताच्या नात्यांमध्येच नाही तर आपुलकीच्या नात्यांमध्येसुद्धा हा सण साजरा केला जातो.

काही नाते मनाचे असतात, आणि ते प्रसंगी रक्ताच्या नात्यापेक्षा देखील मोठे ठरतात. हाच या राखीच्या सणाचा सारांश आहे. मनाचे नाते घट्ट असले कि, आपोआप जिव्हाळा निर्माण होतो असं म्हणलं जात. जसा हा सण जवळ येतो, तसे आपल्याला अनेक सेलेब्रिटीजचे बालपणीचे किंवा काही भन्नाट किस्से ऐकायला मिळतात.

अनेक सेलेब्रिटी आपल्या बालपणीचे किस्से फोटोज द्वारे शेअर करत असतात. केवळ आपल्या सारख्या सर्वसामान्यच नाही तर, सेलेब्रिटीजमध्ये सुद्धा मनाच्या नात्याच्या या राखीच्या सणाचे वेगळे आणि विशेष महत्व आहे. तेसुद्धा आपल्या मानलेल्या भावा-बहिणीसोबत मोठ्या प्रेमाने हा सण साजरा करतात. लाखो दिलो की धाडकन, दीपिका पदुकोणला कोणी भाऊ नाही.

मग ती कोणाला राखी बांधत असेल, असा प्रश्न पडला होता. मात्र त्याचा खुलासा तिने स्वतः कपिलच्या शोमध्ये केला होता. आपल्या बॉडीगार्ड जलालच ती आपला भाऊ समजते, म्हणून त्याला राखी बांधते. असे अनेक भावा-बहिणीचे नाते आपल्याला बघायला मिळतात. असाच एक भन्नाट किस्सा नुकताच एका सेलेब्रिटी क्रिकेटरने शेअर केला आहे.

युवराज सिंगने एका, क्रिकेटरला आपल्या बहिणीपासून दूर राहण्याची सक्त ताकीत दिली होती. युवराजला तर सख्खी बहीण नाही, मग ही नक्की कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर रितिका सजदेहला युवराज सिंग आपली बहीण मानतो. त्यांचे नाते जुळले, तेव्हापासून प्रत्येक वर्षी रितिका युवराजला राखी बांधते. ही रितिका दुसरी कोणी नसून, भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची बायको आहे.

रितिका आणि युवराज एका खेळ-इव्हेंटच्या दरम्यान भेटले होते. त्याचदरम्यान, रितिका आणि त्याची मैत्री झाली. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्या दोघांची भेट होऊ लागली. युवराज अगदी काळजीने रितिकची विचारपूस करत असे. एका पार्टीदरम्यान, काही मुलं रितिकाची छेड काढत असताना, युवराजने त्यांना अडवलं.

मी तिचा भाऊ आहे, असं म्हणत त्या मुलांना चांगला चोप दिला. आणि तेव्हापासून त्या दोघांचे हे मनाचे भावा-बहिणीचे नाते जुळले. रितिका आणि रोहितची भेट सुद्धा युवराजनेच घालून दिली होती. मात्र, एका इव्हेंटच्या दरम्यान रोहित आपल्या बहिणीच्या जवळ जात असल्याच लक्षात आल्यावर युवराजने त्याला सक्त ताकीत दिली.

‘ती माझी बहीण आहे,तू तिच्यापासून दूर आहे. जास्त मैत्री करायची गरज नाहीये. कामास काम ठेव’, असं खडसावत रोहितला युवराज म्हणाला होता. मात्र काही काळानंतर, रितिका-रोहितमधल्या खऱ्या प्रेमाची जाणीव युवराजला सुध्दा झाली. म्हणून त्याने देखील रितिकाची साथ देत, दोघांच्या घरच्यांसोबत त्यांच्या लग्नाबद्दल बोलणी केली. २०१५ मध्ये रितिका आणि रोहितचे लग्न झाले. त्यावेळी, रितिकचा मोठा भाऊ म्हणून युवराज त्या लग्नात काम करत होता.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *