मुलगा कोट्यवधींचा मालक पण आजही बसने प्रवास करतात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे वडील, जगतात साधे-सरळ आयुष्य..

मुलगा कोट्यवधींचा मालक पण आजही बसने प्रवास करतात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे वडील, जगतात साधे-सरळ आयुष्य..

बॉलीवूडमध्ये अनेक असे अभिनेते आहेत जे साधारण जीवन जगायलाच प्राधान्य देतात. काही झाले तरी ते आपला साधेपणा सोडत नाहीत, आणि तेच त्यांचे वेगळेपण ठरते. त्यांच्या या वेगळ्या शैलीमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळते. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी संपूर्ण जगात नाव कमावलं, मात्र राहताना अगदी सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगत आहेत.

केवळ हे सेलेब्रिटी कलाकारच नाही तर, त्यांचे आईवडील देखील साधारण आयुष्य जगताना आपण पाहिले आहे. बॉलिवुडचा हा प्रवास अनेकांसाठी अविश्वसनीय असा ठरला आहे. त्याचाच भाग असलेले काही कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय आजही अगदी साधारण आयुष्य जगतात. प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता इरफान खान, यांनी जगभरात किर्ती कमावली होती.

जॉन सुरुवातीपासूनच आपल्या हटके अशा शैलीसाठी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेता म्हणून जॉनला ओळखले जाते. मागील जवळपास बारा वर्षांपासून तो बॉलिवूडमध्ये काम करत आहे. कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना, जॉनने बॉलिवूडमध्ये केवळ इन्ट्रीच नाही घेतली तर, आज एक यशस्वी अभिनेता देखील आहे.

त्यामुळे सर्वांनाच त्याचे कौतुक आहे. कोटींच्या घरात त्याचे फॅन्स आहेत. मात्र हाच जॉन जेव्हा आपल्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा अगदी साधारण व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगतो. जॉन सांगतो की,’माझे आई-वडील अत्यंत साधे आणि चांगल्या स्वभावाचे व्यक्ती आहेत. त्यांनी कधीच फसवेगिरी केली नाही, त्यामूळे प्रामाणिकपणा काय असते हे मला कायमच त्यांच्याकडे बघून समजते.

आणि आयुष्य जगताना प्रामाणिकपणे केवळ कष्ट करत जगायचे याची प्रेरणा देखील माझे आई-वडील मला देतात. नेहमीच माझ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून नक्की मी माझ्या वडिलासोबत फुटबॉल मॅच बघत असतो. पण एक दिवस युरोपमध्ये त्यांच्या सोबत जाऊन फुटबॉल मॅच पाहण्याची माझ्या मनात इच्छा आहे.

मी जरी आज कोट्यावधी संपत्तीचा मालक असलो तरी, माझे आई-वडील साधारण रिक्षा किंवा बसने सुद्धा प्रवास करतात. आजवर त्यांनी असेच आयुष्य जगले आहे, त्यात त्यांना कधीच अडचण नाही आली. त्यामुळे त्यामध्ये बदल करण्याची त्यांना गरज वाटत नाही.’ आपल्या आई वडिलांच्या साधेपणा बद्दल बोलत असताना जॉन पुढे म्हणतो की, ‘त्यांना सर्वसाधारण व्यक्तींचे आयुष्य जगण्यात आनंद मिळतो, त्यामुळे मला त्यांच्याकडून तो आनंद हिरावून नाही घ्यायचा.

मीही अगदी त्यांचे अनुकरण करत साधारण आयुष्य जगण्यात पसंत करतो.’ जॉनला अनेक वेळा अगदी साध्या कपड्यांमध्ये मोठ्या कार्यक्रमात पाहिले गेले आहे. बऱ्याच वेळा तर तो, केवळ चप्पल मध्येच फिरत असतो. काही चाहत्यांनी त्याला त्याबद्दल प्रश्न विचारले असता, ‘मला चप्पल घातल्यामुळे कम्फर्ट वाटतो. शूज मध्ये तो कम्फर्ट वाटत नाही’ असे जॉन म्हणतो.

जॉन अब्राहमची आई परशी आहे आणि वडील मल्याळी आहेत म्हणून, जॉनची दोन नावे आहेत. त्याचे पारसी नाव फरहान आहे आणि त्याच्या वडिलांनी त्याचे नाव जॉन ठेवले होते. त्याला जॉन याच नावाने सगळीकडे ओळखले जात असले तरीही, त्याची आई मात्र आजही फरहान नावानेच त्याला हाक मारते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.