‘या’ अभिनेत्याला दिलीप कुमार मानायचे मुलगा, बॉलीवूडमधील ‘या’ अभिनेत्यांसोबत होती रक्ताची नाती..

‘या’ अभिनेत्याला दिलीप कुमार मानायचे मुलगा, बॉलीवूडमधील ‘या’ अभिनेत्यांसोबत होती रक्ताची नाती..

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार उर्फ युसुफ खान यांचे दोन दिवसापूर्वीच मुंबईत वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. दिलीप कुमार हे बॉलिवूडमधील दिग्गज असे अभिनेते होते. आपल्यापेक्षा वयाने बावीस वर्षांनी लहान असलेल्या सायराबानू यांच्यासोबत त्यांनी लग्न केले होते. सायराबानू सध्या शहात्तर वर्षांच्या आहेत. या दांपत्याला अपत्य नाही.

मात्र, बॉलीवूड मध्ये त्यांचे अनेक रक्ताचे नाते आहेत. आज आम्ही आपल्याला अशीच काही नात्याबद्दल माहिती देणार आहोत. एका अभिनेत्याला दिलीप कुमार हे मुलगा मानत होते. हा अभिनेता दिग्गज असा अभिनेता आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हे अभिनेता व अभिनेत्री.

1) सायरा बानो- सायराबानू दिलीप कुमार यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या 76 वर्षाच्या आहेत. त्या बावीस वर्षाच्या असतानाच दिलीप कुमार यांनी त्यांच्याशी लग्न केले. त्यांचे वय तेव्हा चौरेचाळीस वर्ष होते. या दोघातील वयाचे अंतर 22 वर्षाचे होते. असे असले तरी या दोघांचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही. या दोघांना अपत्य नाही. सायराबानू ही त्या काळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या.

2) नासिर खान- नासिर खान हे दिलीप कुमार यांचे लहान बंधू आहेत. 1945 मध्ये आलेल्या मजदूर या चित्रपटात ते दिसले होते. मात्र, भारत पा’किस्ता’न फा’ळणी झाल्यानंतर ते पा’किस्ता’नात गेले. पा’किस्ता’नात गेल्यानंतर त्यांनी तेथील चित्रपट सृष्टीमध्ये नशीब आजमावले. मात्र, त्यांना तेथे अपयश आले. त्यामुळे ते परत भारतात परतले आणि येथे चित्रपट करू लागले.

3) बेगम पारा– बेगम पारा या पन्नासच्या दशकांमधील अतिशय ग्लॅमरस अभिनेत्री होत्या. दिलीप कुमार यांचा भाऊ नासीर खान यांच्या बेगम पारा या पत्नी आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. काही वर्षांपूर्वी आलेल्या सावरिया या चित्रपटात त्यांनी सोनम कपूरच्या आजीची भूमिका साकारली होती. नासिर खान यांच्या त्या दुसर्‍या पत्नी आहेत.

4) आयुब खान- आयुब खान यांनी काही वर्षांपूर्वी अनेक चित्रपटातून काम केले. मात्र, आता तो टेलिव्हिजन क्षेत्रात चांगलाच रमला आहे. नासीर खान आणि बेगम पारा यांचा तो मुलगा आहे. या नात्याने तो दिलीप कुमार यांचा पुतण्या लागतो.

5) सायशा सहगल – सायशा सहगल दक्षिणात्य चित्रपटातील दिग्गज अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. सायशा सहगलच्या वडीलाचे नाव सुमित सहगल असे आहे. सुमित हे सायराबानू यांचे सख्खे भाऊ आहेत. ते देखील चित्रपट निर्माते आहेत.

6) अदनान सामी– अदनान सामी हा प्रसिद्ध गायक आहे. काही वर्षांपूर्वी त्याने भारताचे नागरिकत्व पत्करले आहे. तो मूळ पा’किस्ता’नचा रहिवासी आहे. अदनान सामी याचे वडील दिलीप कुमार यांचे चुलत भाऊ होते.

7) शाहरुख खान- शाहरुख खान हा बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जातो. शाहरुखने आपल्या जीवावर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दिलीप कुमार आणि सायरा बानू यांना मुलगा नव्हता. त्यामुळे ते शाहरुख खान याला आपला मुलगा मानतात.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *