‘या’ अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये वाढवली मराठीची शान.. नंबर एकच्या अभिनेत्रीचा आहे अजूनही दरारा…

‘या’ अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये वाढवली मराठीची शान.. नंबर एकच्या अभिनेत्रीचा आहे अजूनही दरारा…

हिंदी चित्रपटसृष्टीत फार पूर्वीपासूनच मराठी अभिनेत्री यांनी आपला काळ गाजवून सोडला आहे. 1960 सत्तरच्या दशकातच मराठी अभिनेत्री त्यावेळी हिंदीतही चालल्या होत्या. त्यातील एक नाव म्हणजे आघाडीच्या अभिनेत्री शशिकला यांचे. तसेच ललिता पवार यांनीदेखील हिंदी मध्ये आपले चांगले नाव क’मावले होते.

हिंदीत ललिता पवार यांचा चांगलाच द’रारा होता. 80 चे दशक ते आत्तापर्यंत अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदी चित्रपट सृष्टीत आपला जम बसवला आहे. यातीलच काही टॉपच्या अभिनेत्रींबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.

8. मंजिरी फडणीस: मंजिरीचा जन्म 1988 मधील असून तिने आजवर हिंदी, तेलुगू, बंगाली, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. 2008 मध्ये आलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटासाठी तिला पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ग्रॅंडमस्ती, किस किस्को प्यार करू हा चित्रपट चालला होता. सर्वात शेवटी तिने बारोट हाऊस या चित्रपटात काम केले होते.

7. रेणुका शहाणे : रेणुका शहाणे यांनी दूरदर्शन पासून आपल्या करीयरची सुरुवात केली असून दूरदर्शनवरील त्यांचा सुरभी हा कार्यक्रम खूप चालला होता. त्यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीत अजरामर झालेल्या हम आपके है कौन चित्रपटात त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. काही वर्षांपूर्वी त्यांनी अभिनेता आशुतोष राणा यांच्या सोबत लग्न केले आहे.

6. सागरिका घोडके : सागरिका घोडके ही मूळ कोल्हापूरची असून काही वर्षांपूर्वी तिने क्रिकेटर जहीर खान याच्यासोबत लग्न केले आहे. सागरिकाने शाहरुख खानसोबत चक दे इंडिया या चित्रपटात काम केले असून त्यानंतर तिने काही चित्रपटात आपल्या भूमीकेने प्रेक्षकांची मने जिंकली.

5. श्रद्धा कपूर : श्रद्धा कपूरच्या आईचे नाव शिवांगी कोल्हापुरे असून पद्मिनी कोल्हापुरे तिची मावशी आहे. शिवंगी यांचे शक्ती कपूर यांच्या सोबत लग्न झाले आहे. श्रद्धा कपूर ने आजवर अनेक चित्रपटातून चांगले काम केले आहे. श्रद्धा कपूर हिने 2010 मध्ये तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

मात्र, खऱ्या अर्थाने तिला आशिकी 2 या चित्रपटातून ओळख मिळाली. त्यानंतर एक विलन हा चित्रपट खूप गाजला. हैदर, उंगली चित्रपट देखील तिचे चांगले चा लले बागी चित्रपटातील तिची भूमिका ही प्रचंड गाजली.

4. सोनाली बेंद्रे : हिंदीमध्ये नव्वदच्या दशकामध्ये या अभिनेत्रींनी आपली छाप सोडली होती. गोविंदासोबत आलेल्या आग चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिचा टक्कर नाराज हा चित्रपटही प्रचंड गाजला. बॉम्बेमधील तिथे हम्मा हम्मा हे गाणं प्रचंड गाजले होते. त्यानंतर दिलजले मध्ये देखील तिची भूमिका चांगलीच गाजली.

अजय देवगण सोबतची जोडी एकदम हिट ठरली. त्यानंतर तिने मेजरसाब या चित्रपटात देखील काम केले. सरफरोश चित्रपटासाठी देखील तिला गौरविण्यात आले होते. सर्वात शेवटी तिने वन्स अपॉन टाईम इन मुंबई दोबारा या चित्रपटात मुमताज खानची भूमिका केली. होती गेल्या वर्षी कॅन्सरने ग्रासले होते. तेव्हापासून ती बॉलिवूडपासून दूर आहे.

3. राधिका आपटे : राधिका आपटे ही चारू आपटे यांची मुलगी असून तिने एका विदेशी व्यक्तीसोबत लग्न केले आहे. लय भारी या चित्रपटात रितेश देशमुखसोबत ती दिसली होती. त्यानंतर तिने हिंदीतही काही चित्रपट केले. मात्र, नेट पिक्सलवर आलेल्या सीक्रेट गेम्स या वेब सिरीजमध्ये तिची चांगली चर्चा झाली. त्यानंतर तिने अनेक हिंदी-मराठी व नाटकात देखील काम केले. काही मालिकादेखील तिने काम केले आहे.

2. उर्मिला मार्तोंडकर: उर्मिला मार्तोंडकर हिने लहानपणापासूनच चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. नव्वदच्या दशकामध्ये आलेला रंगीला हा चित्रपट प्रचंड गाजला. खऱ्या अर्थाने या चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिली. त्यानंतर रामगोपाल वर्मा आणि उर्मिला असे समीकरणच जुळलं.

प्यार तूने क्या किया जंगल हे हिट चित्रपट या जोडीने दिले. त्यानंतर कौन हा थ’रारप’ट देखील प्रचंड चालला होता. काही दिवसांपूर्वी तिने मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

1. माधुरी दीक्षित: ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडला मिळालेली अनोखी देणगी होय. तेजाब, दयावान, हम आपके है कौन यासारख्या अनेक चित्रपटांमधून ताकदीच्या भूमिका माधुरी दीक्षित हिने साकारल्या. आजही बॉलिवुडमध्ये तिचे नाव चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी तिने डॉक्टर श्रीराम नेने यांच्या सोबत लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी ती परत भारतात परतली असून सध्या टीव्ही शोमध्ये काम करते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *