‘या’ अभिनेत्रीमुळे नाना पाटेकर यांच्यापासून त्यांची पत्नी कित्येक वर्षांपासून राहतेय वेगळी…

बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत की जे मराठी पार्श्वभूमीचे आहेत. मराठी असून देखील त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा मोठा दबदबा निर्माण केलेला आहे. यामध्ये जुन्या काळातील अभिनेते अमोल पालेकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. ज्यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांचा बॉलीवूडमध्ये मोठा दबदबा होता, त्यावेळेस अमोल पालेकर यांनी त्यांना टक्कर न देता हलकीफुलकी चित्रपट केले.
त्यांचे चित्रपट प्रचंड चालले. मात्र, अमिताभसोबत त्यांची स्पर्धा कधीच नाही केली, याउलट त्यांनी खुमासदार चित्रपट करून सर्वांची वाहवा मिळाली. चितचोर, गोलमाल सारखे चित्रपट आजही तेवढ्याच आवडीने पाहिले जातात.
मात्र, त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये काही दिसली नाही. आता तिचे दोन्ही मुलं मोठे झाले असून ती बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज झाले आहेत. त्यानंतर संगीतकाराच्या जोड्या देखील अशाच यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वी अजय अतुल ही जोडी मराठी मध्ये आपल्या वेगळ्या धाटणीचे संगीत घेऊन आली.
पाहता पाहता त्यांनी बॉलीवूडमध्ये देखील यश मिळवायला सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये त्यांनी देवा श्री गणेशा हे गाणे देऊन चार चाँद लावले. हे गाणे एवढे गाजलेले आहे की, प्रत्येक गणेशोत्सवामध्ये हे गाणे गायले जाते. तसेच अनेक ठिकाणी गणेशवंदना होण्याआधी हे गाणे म्हटले जाते. त्यामुळे अजय-अतुल यांनी देखील प्रचंड असे चित्रपट दिले आहेत.
या चित्रपटात त्यांनी चार चांद लावले आहेत. त्यांच्याकडे अजून देखील काही चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रमाणे सयाजी शिंदे यांचे नावदेखील घ्यावे लागेल. सयाजी शिंदे यांनी मराठीत काम करून हिंदी मध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे. त्यासोबतच मनोज जोशी हे अभिनेते देखील असेच आहेत.
त्यांनी देखील वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. बॉलिवूडमध्ये ते स्थिरावले आहेत. मराठी त्यांनी कमी चित्रपट केली असले तरी हिंदीमध्ये त्यांनी अधिक चित्रपट केले आहेत.आज आम्ही आपल्याला नाना पाटेकर यांच्या बद्दल सांगणार आहोत. नाना पाटेकर यांच्यावर आजवर अनेक लेख छापून आलेले आहेत.
नाना पाटेकरचे चित्रपट म्हणजे अतिशय दर्जेदार असे असतात. नाना पाटेकर वर्षातून एखादा चित्रपट करतात. मात्र, त्यामध्ये दर्जा हा असतो. नाना पाटेकर यांनी आजवर चरित्र, गंभीर, कॉमेडी, खलनायक भूमिका असलेले अनेक चित्रपट केले आहेत. यामध्ये त्यांचा परिंदा या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
परिंदा चित्रपटांमध्ये त्यांनी डॉ नची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अनिल कपूर यांची देखील भूमिका होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. नाना पाटेकर यांचे वैयक्तिक आयुष्य हे वादविवादाने भरलेले राहिलेले आहे. नाना पाटेकर यांचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव मल्हार पाटेकर आहे, तो चित्रपटसृष्टीशी संबंधीत नाही.
काही चित्रपटांसाठी त्याने प्रयत्न केले होते. मात्र, त्याला यश काही मिळाले नाही. नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव नीलकांती पाटेकर असे आहे. निलकांती या पुण्याचा रहिवासी असून एकूण 78 मध्ये त्यांनी बीएससी ग्रॅज्युएट कंप्लिट केलेले आहे. कॉलेज सुरू असतानाच त्यांना नाटकाची आवड निर्माण झाली होती.
त्यानंतर त्यांनी अनेक नाटक केलेले आहेत. एका नाटकादरम्यान त्यांची आणि नाना पाटेकर यांची भेट झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघांनीही लग्न केले. त्यानंतर त्यांना मल्हार हा मुलगा देखील झाला. मात्र, अग्निसाक्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांचे नाव मनिषा कोईरालासोबत जोडले गेले होते.
त्यानंतर त्यांच्या संसारामध्ये मिठाचा खडा पडला आणि त्यानंतर आता नीलकांती आणि नाना पाटेकर गेल्या अनेक वर्षांपासून विभक्त राहतात. दोघेही परस्पर संमतीने वेगळे राहत असल्याचे सांगण्यात येते. आता याचे खरे कारण या दोघांनाच माहिती असावे.