‘या’ तारखेला करीना देणार दुसऱ्या बाळाला जन्म, वडील रणधीर कपूर यांनी कॉन्फर्म केली डेट, म्हणाले आम्हाला मुलगा किंवा मुलगी नाही तर…..

करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घरी लवकरच नवीन पाहुणा येणार आहे. पुढच्या आठवड्यात म्हणजेच १५ फेब्रुवारीला करिना बाळाला जन्म देईल असं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे करिना आणि सैफ दोघंही बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असून त्यांनी काही महिन्यांपासूनच बाळाच्या आगमनाची तयारी करायला सुरुवात केली होती.
एका इंग्रजी वेबसाइटच्या बातमीनुसार, साधारणपणे पुढच्या आठवड्यात करिना तिच्या दुसर्या बाळाला जन्म देईल. मॅटर्निटी लीव्हवर जाण्यापूर्वी करिनाने तिची सर्व व्यावसायिक कामं संपवली होती.
तसेच रणधीर कपूर याना जेव्हा विचारले कि तुम्हाला मुलगा हवा आहे कि मुलगी तेव्हा ते म्हणाले कि “मुलगा किंवा मुलगी नाही तर, आम्हाला एक निरोगी व आनंदी मूल हवे आहे आणि आपणास हे देखील सांगू इच्छितो कि आमचे संपूर्ण कुटुंब या येणाऱ्या बाळाची वाट पाहत आहे.
त्याचवेळी काही महिन्यांपूर्वी करीनाचे वडील म्हणाले होते कि, मी खूप खूष आहे, मी करीनाला बर्याच काळापासून सांगत होतो की तिच्याबरोबर खेळण्यासाठी तसेच तैमूरला एक भाऊ किंवा बहीण आवश्यक आहे. आम्ही सर्व खूप आनंदी आहोत आणि आम्ही प्रार्थना करतो की बाळ सुखी आणि निरोगी असेल.
तसेच करिनाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, या प्रे ग्नन्सीवेळी ती फारशी चिंतेत नाहीए. मात्र तैमुरवेळी तिला अधिक काळजी आणि चिंता होती. दुसऱ्या प्रे ग्नन्सी ती जास्त एन्जॉय करत आहे. तसेच प्रे ग्नेंसीच्या शेवटच्या दिवसात देखील ती स्वत:ची भरपूर काळजी घेत आहे.
डाएटसोबत वर्कआउट, एक्सरसाइज आणि योगासन देखील करत आहे. प्रे ग्नेंसीच्या काळात योग करतानाचे काही फोटो तिने शेअर केले होते. एका प्रमोशनल फोटोशूटवेळी तिने योगा पोज दिल्या आहेत. यामध्ये करिना ब्लॅक वर्कआउट आउटफिट मध्ये वेगवेगळी योगासन करताना दिसतेय.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सैफ आणि करिनाने ‘सेकंड बेबी’ची घोषणा केली होती. याआधी सैफ आणि करिनाला तैमूर नावाचा मुलगा आहे. ‘तैमूर’ हा सेलिब्रिटी बेबी ठरला आहे.