‘या’ दिग्ग्ज मराठी अभिनेत्रीने वयाच्या 60 व्या वर्षी घेतले सात फेरे, 65 वर्षीय ‘या’ म्हाताऱ्यासोबत लग्न करून….

कोणाच्याही स्वप्नाला, आवडी निवडी किंवा लग्नासाठी कोणत्याही वयाची अट नसते. कोणीही कधीही कोणतेही स्वप्ने पाहू शकतात आणि ती बघितलेली स्वप्न कधीही पूर्ण करू शकतात. त्याप्रमाणे कोणीही कधीही आपला जीवनसाथी जीवनात कधीही शोधू शकतो. मग त्यासाठी कोणत्याही वयाचे खास असे बंधन नसते.
जरी समाज्याच्या रितीनुसार ठरलेल्या वेळेतच लग्न करावे असे वयक्तिक नियम चालत आले असतील तरी देखील मुलींचं वय 18 आणि मुलाचे वय 21 पूर्ण झाले की कायद्याने ते लग्नबंधनात अडकण्यास त्यांचे मार्ग मोकळे होतात. परंतु त्यानंतर लग्न करण्यास कोणत्याही वयाची अट नसते. कोणीही कधीही कुणाही सोबत लग्न करू शकतात.
दोघांनीही आपले आयुष्य आणि भिन्न प्रोफेशन यामधील अडथळे दूर सारत नवीन जीवन सुरू केले. त्यांच्या प्रेमाची आणि लग्नाची कहाणी फिल्म स्क्रिप्टपेक्षाही काही कमी नव्हती.
1990 मध्ये सुहासिनी मुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील होती पण काही काळानंतर ती वेगळी झाली. सुहासिनीला बॉलिवूड आणि टीव्हीवर बरेच काम करायचे होते त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल विचार करण्याची संधी तिला मिळाली नव्हती. त्यानंतर सुहासिनी दोन दशके अविवाहित राहिली.
सुहासिनीने ‘जोधा अकबर’ आणि ‘दिल चाहता है’ यासारख्या मोठ्या चित्रपटात काम केले आहे. 1999 साली ‘हू तू तू’ चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ती जगासाठी एक यशस्वी अभिनेत्री होती. पण जगाच्या नजरेपासून दूर नेहमीच तीच्या मनात एका सहजोडीदाराची आस नेहमीच राहत होती.
तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण तेव्हा आले जेव्हा एका सहकाऱ्याने कामासाठी तिला फेसबुक अकाउंट तयार करण्यास सांगितले. त्याच वेळी तीची भेट फेसबुकवरून अतुल सोबत झाली. त्यांचे संभाषण फेसबुकच्या माध्यमातून सुरू झाले आणि त्यानंतर नंबरची देवाणघेवाण झाली. एके दिवशी अतुलने सुहासिनीला सांगितले की 6 वर्षांपूर्वी त्याने त्याची पहिली पत्नी गमावली आहे.
वयात अडथळा निर्माण न करता अतुलने सुहासिनीला रिलेशनची ऑफर दिली. विषेश म्हणजे त्यावेळी त्यांचे वय 65 वर्ष होते. या त्याच्या शैलीने सुहासिनीच्या मनाला स्पर्श केला. या दोघांनी लग्न करून जगासमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे. बरेच लोक अजूनही विश्वास ठेवत नाहीत की वयाच्या 60 व्या वर्षी, लग्न करून कोणीही स्थायिक होऊ शकते.
या वयात लग्न करून सुहासिनीने त्यांच्यासमोर एक उदाहरण ठेवले आहे. विशेषतः मुलींसाठी. प्रथम, सुहासिनीने तिच्या मंगेत्राशी कोर्टात लग्न केले. आणि मग आर्य समाजाचे रीती रिवाजाप्रमाणे मुंबईत लग्न झाले आणि ते दोघे मुंबईत स्थायिक झाले.