‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचे वडील होते इंदिरा गांधींचे पर्सनल पायलट, खुलासा करत अभिनेत्री म्हणाली माझे वडील..

मागील आठवड्यात आपण सर्वांनी स्वातंत्र्य दिवस साजरा केला. दरवर्षीच या खास मुहूर्तावर देशभक्तीपर सिनेमा रिलीज होतात. शेरशाह या सिनेमाने सध्या सगळीकडेच तुफान धूम केली आहे. कारगिल युद्धावर आधारित मेजर विक्रम बत्रा यांच्या शौर्याची गाथा त्यामध्ये खूपच सुंदर प्रकारे दाखवण्यात आली आहे.
सिद्धार्थ मल्होत्राने देखील विक्रम बत्रा यांची भूमिका खूपच उत्तम प्रकारे रेखाटली आहे. एकूणच हा सिनेमा सर्वांच्या पसंतीस उतरत आहे आणि सगळीकडून या सिनेमाचे चांगलेच कौतुक होत आहे. सिनेमाच्या दिग्दर्शकला खास करुन चांगलीच दाद मिळत आहे. अजय देवगनचा भुज सिनेमा देखील माघील आठवड्यात रिलीज झाला. त्या सिनेमाला देखील चांगलीच दाद मिळत आहे.
आपल्या हॉट आणि ग्लॅमरस अंदाजाने नेहमीच आपल्या चाहत्यांना घायाळ करणाऱ्या लाराने या सिनेमांमध्ये भारताच्या सर्वोत्तम पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारलीये. मात्र या भूमिकेत तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे. इतक्या जास्त उत्तम प्रकारे तिने ही भूमिका साकारली, असे क्रिटिक्सचे मत आहे. ‘सिनेमाच्या मेकर्सने जेव्हा मला या भूमिकेसाठी ऑफर दिली होती त्यावेळी धक्का बसला.
ज्या व्यक्तीबद्दल आयुष्यभर ऐकत आलो आहोत, ज्या व्यक्तीबद्दल कायमच आदर होता आहे आणि राहील. ज्या व्यक्तीने आपल्या धाडसाने आणि कर्तृत्वाने संपूर्ण जगभरात ख्याती मिळवली. इतिहासात ज्यांचे नाव अजरामर झाले, अशा व्यक्तीची भूमिका साकारायला मिळणे म्हणजे मोठी गोष्ट आहे. मी कधीही स्वप्नात देखील विचार केला नव्हता की इंदिरा गांधी ची पात्र रेखाटण्याची संधी मला मिळेल.
ती संधी मला मिळाली तेव्हा सहाजिकच मी ती सोडली नाही. मेकअप आणि माझ्या लूकसाठी मी जास्त उत्साहित होते. सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का मला विक्रम गायकवाड यांनी दिला. विक्रमने माझ्या चेहऱ्याचा साचा बनवला आणि कृत्रिम चेहरा बनवला. जेव्हा मी त्या साच्यासह तयार झाले तेव्हा मला पाहून सर्वांना धक्काच बसला. मी आरशात स्वतःला पाहिले तेव्हा एक क्षण स्वतःला ओळखूच शकले नाही.
बऱ्याच अंशी माननीय इंदिरा गांधी सारखा लुक देण्यात गायकवाड यांना यश आले होते. इंदिरा गांधीचे हावभाव पडद्यावरून रेखाटण्यासाठी मी त्यांच्या, अनेक मुलाखती पाहिल्या. खास करून माझ्या वडिलांची मदत घेतली. कदाचित सर्वांना आश्चर्य वाटेल पण माझे वडील इंदिरा गांधीचे वैयक्तिक वैमानिक होते. लहानपणापासून त्यांच्याबद्दलच्या कथा मी ऐकल्या आहेत.
पप्पा इंदिरा गांधीचे व वैयक्तिक वैमानिक असल्यामुळे काही अनकही किस्से देखील मला सतत त्यांच्या बद्दल ऐकायला मिळत राहिले आहेत. माझ्या वडिलांनी देशासाठी 3 युद्ध लढले आहेत. देशभक्ती सहाजिकच माझ्याही रक्तातच आहे.
आपल्याला नेहमीच शिकवले जाते की देशापेक्षा काही महत्त्वाचे नाही, माझ्या वडिलांनीही मला तेच शिकवले. माझे काम करण्यात मी आनंदी आहे, आता लोकांच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहत आहे.’असे लारा दत्ताने मुलाखतीमध्ये आपले मन व्यक्त केले. दरम्यान, लारा दत्तच्या अभिनयाला क्रिटिक्स देखील भरभरून दाद देत आहेत.