‘या’ मराठी अभिनेत्याचा बदललेल्या लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ बॉलिवूड मध्ये दिसणार ‘सोल्जर’च्या मुख्य भूमिकेत…

बॉलीवूडमध्ये करिअर करायचे असले तर तुमच्याकडे अभिनयचे गुण र’क्तातच असावे लागतात. मात्र, यासोबत तुमची देहबोली शरीरयष्टी देखील फार मोठ्या प्रमाणात असावी लागते. नाहीतर तुम्हाला बॉलिवुडमध्ये अधिक किंमत कोणीही देत नाही. याला काही अपवाद देखील आहेत. दिवंगत अभिनेता इमरान खान याची शरीर यष्टी जेमतेमच होती.
मात्र, अभिनयाच्या जोरावर त्याने अनेक चित्रपटातून दर्जेदार अशी भूमिका केली होती. त्यानंतर नवाजुद्दीन सिद्दिकी याचे नाव घ्यावे लागेल. हा अभिनेता देखील जेमतेम प्रकृती असलेलाच आहे. मात्र, तरीदेखील अभिनयाच्या जोरावर त्याने अनेक हिट चित्रपट बॉलिवूड दिलेले आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये सुरू झालेला हा ट्रेंड आता मराठी चित्रपटात देखील रुजू पाहत आहे.
यासोबतच संतोष जुवेकर या अभिनेत्याचे नाव देखील घ्यावे लागेल.काही वर्षांपूर्वी मराठी मध्ये नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु ही अतिशय लोकप्रिय ठरली होती. यासोबतच या चित्रपटामध्ये परशाची भूमिका साकारणारा आकाश ठोसर हा देखील चांगलाच गाजला होता. त्यानंतर रिंकू राजगुरु हिला जेमतेमच चित्रपट मिळाले.
मात्र, या चित्रपटाची चर्चा ही चांगलीच रंगली होती. त्यानंतर हिंदी मध्ये देखील या चित्रपटाचा रिमेक करण्यात आला. हिंदी मध्ये धडक या नावाने या चित्रपटाचा रिमेक करण्यात आला. या चित्रपटामध्ये श्रीदेवीची मुलगी जानवी कपूर दिसली होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आज आम्ही आपल्याला आकाश ठोसर याबाबत माहिती देणार आहोत. आकाश ठोसर हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे, याचे कारण देखील तसेच आहे.
आकाश ठोसर सध्या महेश मांजरेकर यांच्या सोबत काम करत आहे. मांजरेकर बनवत असलेल्या वेबसिरीज मध्ये त्याला भूमिका मिळाली आहे. ‘1962 द लास्ट इन हिल्स’ या वेब सीरीजमध्ये तो दिसणार आहे. या वेब सिरीजमध्ये त्याच्यासोबत अक्षय देओल ची भूमिका देखील आहे. त्यासोबतच सुमित व्यास याने देखील या वेबसीरिज मध्ये भूमिका केली आहे.
या भूमिकेबाबत बोलताना आकाश ठोसर म्हणाला की, वास्तववादी कथा असलेली ही वेब सिरीज आहे. हे सर्वांनाच नक्कीच आवडेल. 26 फेब्रुवारी रोजी ही वेबसिरीज डिज्नी प्लस आणि हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या वेबसीरीजमध्ये काम करण्यासाठी आकाश ठोसर याने पिळदार अशी शरीरयष्टी बनवलेली आहे.
त्याने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. त्याचा या फोटोला चाहत्यांची प्रचंड लाइक्स मिळाले आहेत. आकाश याने आपल्या चाहत्यांचे यासाठी आभार देखील मानलेले आहेत.