‘या’ विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती तब्बू, त्याच्यामुळेच अजूनही केले नाही लग्न, म्हणाली त्याने फक्त माझा वापर करून ..

‘या’ विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती तब्बू, त्याच्यामुळेच अजूनही केले नाही लग्न, म्हणाली त्याने फक्त माझा वापर करून ..

तब्बूची गणना आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. अभिनेत्री तब्बूचे आजही अनेक चाहते आहेत. ९० च्या दशकात तब्बूच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. १९८० मधल्या बाजार चित्रपटात तब्बू पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांत काम केले. आजही ती तितकीच अ‍ॅक्टिव्ह आहे़.

विजयपथ या सिनेमातून नायिका म्हणून फिल्मी करिअर सुरू करणारी अभिनेत्री तब्बू आजही अविवाहित आहे. मी अविवाहित असण्याला अजय देवगण जबाबदार असल्याचे तब्बूने एका मुलाखतीत सांगितले होते. ‘मी आणि अजय आम्ही 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो.

अजय हा माझ्या चुलत भावाच्या शेजारी राहत होता. माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून अजय माझ्यासोबत आहे. त्या काळात माझा चुलत भाऊ समीर आणि अजय दोघे सतत माझ्यासोबत असायचे. कुठलाही मुलगा माझ्यासोबत बोलला तरी हे दोघे त्याला धमकावत असत. आजही मी अविवाहित ते फक्त अजय देवगणमुळेच,’ असे तब्बूने सांगितले होते.

तब्बू आजही अविवाहित असली तरी तिचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. संजय कपूर, साजिद नाडियाडवाला आणि नागार्जुन यांच्यासोबत तब्बूच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच रंगल्या. नागार्जुनसोबतच्या तिच्या अफेअरची चर्चा तर प्रचंड रंगली.

दोघे अनेक वर्षं नात्यात असले तरी दोघांचे लग्न होऊ शकले नाही. याचे कारण म्हणजे, नागार्जुन विवाहित होते. पण तब्बू त्यांच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, तिने मुंबई सोडून हैदराबादमध्ये नागार्जुन राहायचे अगदी तिथेच घर घेतले होते.

तब्बूने अनेक वर्षे नागार्जुन यांची प्रतीक्षा केली. पण नागार्जुन पत्नीला घटस्फोट द्यायला तयार नव्हते. अखेर तब्बूने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आणि २०१२ मध्ये दोघे कायमचे वेगळे झाले. नागार्जुन त्याच्या आयुष्यात पुढे गेला पण तब्बू आजही अविवाहित आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *