‘या’ व्यक्तीमुळेच आज सुपरस्टार झाले रजनीकांत, ‘हा’ व्यक्ती नसता तर आजही बस कंडक्टरच काम करत असते रजनीकांत…

‘या’ व्यक्तीमुळेच आज सुपरस्टार झाले रजनीकांत, ‘हा’ व्यक्ती नसता तर आजही बस कंडक्टरच काम करत असते रजनीकांत…

भारतीय सिनेमातील सुपरस्टार्सचा विषय निघाला की सर्वात आधी नाव येतं म्हणजे रजनीकांत. इतक्या वर्षात एक्शन, इमोशन आणि ड्रामा प्रत्येक भूमिकेत रजनीकांतनं चाहत्यांची मनं जिंकली. रजनीकांत यांच्यावर चाहत्यांचे इतके प्रेम आहे की केवळ भिंतींवरतीं त्यांचे पोस्टर लागत नाहीत तर मंदिरात पूजा केली जाते.

अलीकडेच अभिनेता रजनीकांतला दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. रजनीकांतला या स्टारडमपर्यंत पोहचवण्यात कुणाचं योगदान आहे? जाणून घ्या. रजनीकांतने दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांचा वाहनचालक राज बहादूर यांना समर्पित केला. थलाइवा या सिनेमासाठी रजनीकांतला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

५० वर्षाची मैत्री आजही कायम
राज बहादूर आणि रजनीकांत यांच्यातील मैत्रीला अनेक दशकं उलटली. दोघांमध्ये जवळपास ५० वर्ष मैत्री आहे आजही ती अशीच कायम आहे. रजनीकांत आज यशाच्या शिखरावर पोहचले आहेत. परंतु आजही त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या मैत्रीत कुठेही अंतर येऊ दिलं नाही. राज बहादूर या व्यक्तीमुळेच शिवाजीराव गायकवाडचा रजनीकांत बनला. राज बहादूर यानेच रजनीकांतला तामिळ भाषा शिकवली.

रजनीकांतबद्दलच्या मैत्रीबाबत राज बहादूर म्हणतो की, १९७० मध्ये मी रजनीकांतला भेटलो होतो. त्यावेळी तो बसमध्ये कंडक्टर होता आणि मी ड्रायव्हर. आमच्या पूर्ण स्टाफमध्ये रजनीकांत सर्वोत्तम अभिनेता होता. विभागाच्या प्रत्येक कार्यक्रमात तो त्यांची कला सादर करायचा. त्यावेळी मीच रजनीला चेन्नईला जाऊन एक्टिंग स्कूलमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला.

२ वर्षानंतर कोर्स संपला तेव्हा एका कार्यक्रमात फिल्ममेकर बालाचंदर प्रमुख पाहुणे बनून आले होते. रजनीकांतचा अभिनय त्यांना इतका आवडला की त्यांनी तामिळ शिकण्यास सांगितले. त्यानंतर तामिळ शिकल्यानंतर काय झाले पुढे सगळ्यांनाच माहिती आहे. इतकचं नव्हे तर एक्टिंग स्कूलमध्ये खर्च करण्यासाठी रजनीकांतला राज बहादूरच्या त्याच्या पगारातील २०० रुपये दर महिन्याला द्यायचा. आज राज बहादूरसाठी रजनीकांतच्या घरात एक स्पेशल खोली राखीव आहे. राज बहादूर भेटण्यासाठी गेले असता ते याच खोलीत राहतात.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.