‘या’ व्यक्तीमुळेच धक धक गर्ल माधुरी दीक्षितने केले अमेरिकेतील जेंटलमॅन डॉ. नेनेसोबत लग्न..

‘या’ व्यक्तीमुळेच धक धक गर्ल माधुरी दीक्षितने केले अमेरिकेतील जेंटलमॅन डॉ. नेनेसोबत लग्न..

बॉलीवूड मध्ये कोणत्याही अभिनेत्रीची लोकप्रियता तिचा विवाह होऊ पर्यंतच असते. सुरुवातीचे पाच ते सातच वर्ष कोणत्याही अभिनेत्रीचे करियर असते,असे अनेक समज सुरुवातीला आपल्या बॉलीवूडमध्ये बघायला मिळत होते. त्यामुळे, अनेक अभिनेत्री आपले करियर संपेल या भीतीने लग्न करायचे टाळत असे.

तर काही अभिनेत्री गुपचूप लग्न उरकून घेत, मात्र ही बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवत असे. बऱ्याच अभिनेत्रीने असं केल्याचे आपण पहिले आहे. त्या काळात अभिनेत्रीचा विवाह खूप मोठा मुद्दा होता. कोणत्याही अभिनेत्रीने अग्न केले, म्हणजे तिची लोकप्रियता कमी होणारच हे नक्की असायचं.

मात्र त्यांची ही कहाणी अजूनही अनेकांसाठी एक मोठा प्रश्न आहे. एक अभिनेत्री आणि डॉक्टर यांची ओळख झाली कोठे, आणि लग्न करण्याचा निर्णय कसा घेतला? या बद्दल अनेकांना अजूनही प्रश्न आहे. मात्र याबद्दलचा खुलासा माधुरीने स्वतः एका मुलाखतीमध्ये केला होता. अनुपम खेर यांच्या टॉकशोमध्ये माधुरीने आपल्या आणि डॉ श्रीराम नेने यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं होत.

एक दिवस अचानक अजित दीक्षित म्हणेजच माधुरीच्या भावाने तिला फोन केला आणि तातडीने लॉस एन्जलिस मध्ये येण्याची विनंती केली. आजवर अजितने कधीच माधुरीला काहीही माघीतले नव्हते, त्यामुळे तिने देखील आपल्या सिनेमाच्या सर्व डेट्स ऍडजस्ट केल्या आणि लॉस एन्जलिसला गेली.

तिथे अजित माधुरीला एका पार्टीमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिची आणि डॉ श्रीराम नेने यांची पहिली भेट झाली. ‘डॉ श्रीराम यांना भेटून हाच माझा खरा जोडीदार आहे असं मला वाटलं आणि मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या लग्नाचा, माझ्या करियरवर असा परिणाम होईल याबद्दल मी कधीच विचार केला नव्हता. आपण लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, आणि आता लग्न करू नये असा विचार देखील तेव्हा माझ्या मनात आला नाही.

मात्र श्रीराम पेक्षा उत्तम जोडीदार मला भेटूच शकला नसता हे मला माहित आहे. माझ्या आयुष्याचा त्यांच्याशिवाय मी, आज विचार देखील करू शकत नाही. त्यांनी माझं आयुष्य पूर्ण केलं आहे.’ असं माधुरी म्हणते. मात्र तिच्या भावामुळेच बॉलीवूडच्या धक धक गर्लचा म्हणजेच माधुरीचा, विवाह एका डॉक्टरसोबत झाला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.