राणी मुखर्जीसोबत काम केलेल्या ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता देतोय भ- यंकर आ जाराशी झुं-ज, पहा इंटरनेट वरून होतेय मदतीची मागणी…

इंटरनेटच्या या दुनियेत आज आपण मीडिया च्या विविध क्षेत्रातून बघत असतो की कुणाला तरी कुणाची तरी नेहमीच मदत घ्यावी लागते. एखादी अशी व्यक्ती असते ज्यांना मोठ्या आजाराने ग्रासलेले असते. परंतु इलाज करण्यासाठी त्यांचेकडे तितके मुबलक पैसे उपलब्ध नसतात. तेव्हा मीडियाद्वारे फेसबुक असो की इंस्टाग्राम असो. त्या वरून आजाराचे निदान करण्याकरिता आर्थिक स्वरूपाची मदत मागितली जाते. हे काही फक्त सर्वसामान्य लोकांनाच लागू होते असे नाही.
तर प्रसिद्ध होऊन गेलेल्या काही कलाकारांना देखील या समस्येला तोंड द्यावे लागते. आर्थिक स्वरूपाची मदत करण्यास देखील दानशूर लोक मागेपुढे बघत नाही. आपल्या प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे प्रत्येक जण काही ना काही आर्थिक मदत करून आपली समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडत असतो. आज आपण अश्याच एका बॉलिवुडच्या अभिनेत्या बद्धल जाणून घेणार आहोत.
पूजा भट्टने ट्वीटमध्ये शेअर केला फराज खानचा फोटो-
पूजा भट्ट ने फराज चा फोटो ट्विटर चे अकाउंट वरून शेयर करत कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, “कृपया तुम्हाला जितके शक्य होईल तितके हे ट्विट शेअर करा आणि कॉन्ट्रिब्यूट करा. असे केल्यास तुमची मी सदैव आभारी असेल. ” फराजविषयी अधिक माहिती आणि फंड ट्रान्सफर करण्याविषयी माहितीही तिने त्या कॅपशन सोबत दिली आहे. “फराज जवळपास एक वर्षापासून या आजाराने पीडित आहे.
प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्याने लॉकडाऊन चालू असताना व्हिडिओ कॉल द्वारे डॉक्टरांची ट्रिटमेंट घेतली होती. मात्र त्याचा फारसा काही फायदा होताना दिसून आला नाही. मात्र दिवसेंदिवस खालावत चाललेली त्याची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात भरती होण्यासाठी सांगितले होते.”फराज खानच्या उपचारासाठी जवळपास 25 लाखांची गरज होती. फंड रेजर कॅम्पेनमधून 1 लाख 8 हजार रुपये जमले आहेत.आणखी 24 लाखांची कमतरता फराज याला कमी पडत होती.
गरज असल्यामुळे जितके होईल तितके मदत करा असे आवाहन पूजा भट्ट करत आहे. फराज खान हा सुप्रसिद्ध अभिनेते युसूफ खान यांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे करिअरच्या सुरूवातील ‘मैने प्यार किया’ सिनेमासाठी सूरज बडजात्या याची सलमान नहीतर फराज पहिली चॉईस होता.
सुरज बडजात्या यांनी ‘मैंने प्यार किया’ साठी अनेक नवीन नवीन चेह-यांचे ऑडिशन देखील घेतले होते आणि त्यावेळी यातून फराज खानची निवड करण्यात आली होती. त्या चित्रपटासाठी फराजला साइन करण्यात आले होते. चित्रपटाची शूटिंगची तारीखदेखील ठरली होती. परंतु अचानक फराज खूप आजारी पडला. चित्रपटाची शूटिंग करणेही त्याला शक्य नव्हते.
फराज ‘प्रेम’च्या भूमिकेसाठी योग्य आहे या मतावरच सुरज ठाम होते. पण फराजची तब्येत सुधारण्याची कुठलेही चिन्हे दिसत नव्हती. अखेर सूरज बडजात्यांना फराज च्या जागी दुसरा पर्याय शोधणे उचीत ठरवले. याचदरम्यान कुणीतरी त्यांना सलीम खान यांच्या मुलाचे म्हणजेच अभिनेता सलमान खानचे नाव सुचवले. त्यावेळात सलमान देखील सिनेमांच्या शोधात होता. सुरज यांना सलमान ‘प्रेम’च्या भूमिकेसाठी योग्य वाटला आणि त्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.