रातोरात स्टार बनलेली ‘मै हु खुशरंग हिना’ची जेबा अचानक झाली गायब, पहा एक नाही तर 4 नवरे करून आता….

आज आम्ही आपल्याला पा’किस्ता’नच्या अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. ज्या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये चांगलाच धु’माकूळ घातला होता. जिच्या सुंदर, निष्पाप चेहऱ्याने चाहत्यांना अक्षरश: वे’डे केले होते. होय, या अभिनेत्रीचे नाव म्हणजे जेबा बख्तियार, ‘हिना’ रिलीज झाला आणि जेबा रातोरात स्टार झाली.
पण कालांतराने ही ‘हिना’ बॉलिवूडमधून गा’यब झाली, ती कायमचीच…30 वर्षांआधी राजीव यांनी ‘हिना’ हा सुपरडुपर सिनेमा साईन केला होता. चित्रपटाचे नायक होते दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि नायिका होती जेबा बख्तियार, मात्र जेबा आज आपल्याला बॉलिवूडमध्ये दिसत नाही.
असे म्हणतात की, जेबाचे सौंदर्य पाहून राज कपूर इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी लगेच तिला ‘हिना’ची ऑफर दिली होती. १९९१ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता आणि तेव्हा जेबासोबत ऋषी कपूर आणि अश्विनी भावे या चित्रपटात दिसले होते.
पण जेबाच्या अभिनयापुढे सगळेच फिके पडले. या चित्रपटात जेबाने ‘हिना’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती आणि त्यावेळी ‘मैं हू खुशरंग हिना’ हे या चित्रपटाचे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते.
बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाल्यावर जेबाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या आयुष्यात जेबाने एक नाही, दोन नाही तर चार लग्न केलीत. आपणास सांगू इच्छितो कि जेबाने सलमान वालियानीसोबत पहिले लग्न केले होते.
त्यानंतर त्यांना एक मुलगीही झाली होती. पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि यानंतर जेबाने सिंगर अदनान सामीसोबत लग्न केले. अदनान व जेबा यांना एक मुलगा झाला. पण जेबाचे हे दुसरे लग्नही केवळ दोन वर्षे टिकले. १९९७ मध्ये दोघे विभक्त झालेत.
यानंतर जेबाने अभिनेता जावेद जाफरीसोबत लग्न केले. अर्थात जेबाने या लग्नाचा इन्कार केला. पण जावेदने ‘निकाहनामा’ दाखवल्यावर खरे ते सगळे जगासमोर आले. बॉलिवूडमधील करिअर संपल्यानंतर जेबा पाकिस्तानला परतली होती. येथे तिने सोहेल खान लेगारीसोबत चौथे लग्न केले. पण हा सोहेल कोण, याबद्दल मात्र फार माहिती नाही आहे. पण सध्या जेबा पा’किस्ता’नात डेली सोपचे दिग्दर्शन करीत आहे.