‘राधे’च्या ‘सिटी मार’ गाण्यावर डॉक्टर्सनी धरला ताल, पाहा हा भन्नाट VIDEO

‘राधे’च्या ‘सिटी मार’ गाण्यावर डॉक्टर्सनी धरला ताल, पाहा हा भन्नाट VIDEO

अभिनेता सलमान खानचा वॉन्टेड चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तेव्हा पासूनच सलमान खान च्या करिअरला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि तो चित्रपट सलमानच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला तेव्हापासून सलमानचे जवळजवळ सर्व चित्रपट हिट ठरू लागले.

त्या चित्रपटातील सलमानने साकारलेली राधेची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड प्रमाणात आवडली होती. त्यात सलमान खान सोबत आयशा टाकिया अभिनेत्री झळकली होती. पण गेल्या काही वर्षांपासून सलमान खान वॉन्टेडचा सिक्वल घेऊन येणार होता आणि याची वाट पेक्षही बघत होतो. सलमानसाठी हा त्याचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट होता.

त्या चित्रपटाचे नाव 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या वॉन्टेड या चित्रपटावरून घेण्यात आले होते ‘राधे युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ असे या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले होते. आणि हा चित्रपट गेल्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता पण को’रोना म’हामा’रीमुळे प्रदर्शन लांबणीवर पडले आणि नुकताच हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

अभिनेता सलमान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. तर सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे. सलमानचा हा पहिला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. पण प्रेक्षकांनी इथेही चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यातचं पाहायला मिळत आहे. शिवाय चित्रपटातील गाणीही हीट होताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच राधे चित्रपटातील ‘सिटी मार’ हे सलमान खान आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांच्यावर चित्रित झालेलं गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलं होत. गाणं प्रेक्षकांना चांगलच भावलं असून सध्या ट्रेंडिंगवर आहे. याच गाण्यावर आता चक्क दवाखान्यातील डॉक्टर्सनी ताल धरल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
चित्रपटातील आभिनेत्री दिशा पाटनीने डॉ’क्टर्सचा हा व्हिडीओ सोशल मीडिया वर तिच्या स्टोरीवर शेअर केला आहे. व्हिडीओत डॉ’क्टर्सचा एक ग्रुप अगदी आनंदाने या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. सध्या देशात चिंतेचं वातावरण आहे. अशातच आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ता’ण आहे. पण तरीही त्यातून त्यांनी आनंद शोधत हे सुंदर नृत्य केल्याने त्यांच्यावर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

तर त्यातून ते इतरांना प्रेरणाही देत आहेत. ईदच्या मुहुर्तावर राधे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिल्याचं पाहयला मिळालं. Zee5 वर हा चित्रपट पाहता येत आहे. चित्रपटात सलमान व्यतिरिक्त अभिनेत्री दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *