लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केले होते 2 लग्न, पहा पहिली पत्नी होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री…

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केले होते 2 लग्न, पहा पहिली पत्नी होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री…

मराठी सिनेसृष्टीत आजवर अनेक विनोदी अभिनेते आले. पण काही अभिनेत्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. आजही ते अभिनेते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. असेच एक अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे.

आपल्या अचुक कॉमिक टायमिंगने लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले होते, तर काही काही चित्रपटांमधून प्रेक्षकांना रडवले देखील. मराठीतच नव्हे तर हिंदीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला. 16 डिसेंबर 2004 मध्ये त्यांचे निधन झाले.

अनेक सुपरहि*ट चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. मराठीसोबतच त्यांनी हिंदीमध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विनोद शैलीने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डेने खऱ्या आयूष्यात दोन लग्न केली आहेत.

प्रिया बैर्डेंबद्दल तर सर्वांनाच माहीती आहे. पण त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल खुप कमी लोकांना माहीती आहे. त्यांच्या पहिल्या पत्नी देखील एक अभिनेत्री होत्या. आज आपण लक्ष्मीकांत बैर्डच्या पहील्या पत्नीबद्दल जाणून घेणार आहोत.

करिअरच्या सुरुवातीला लक्ष्मीकांत बैर्डेने अनेक वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आणि रंगभूमीवर काम केले. पण त्यांना काही खास यश मिळत नव्हते. पण त्यांनी हिम्मत सोडली नाही. ते अनेक चित्रपट साईन करत होते. याच कालावधीमध्ये त्यांनी कमाल माझ्या बायकोची हा चित्रपट साईन केला.

या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री रुही काम करत होत्या. कमाल माझ्या बायकोची चित्रपटाच्या सेटवर या दोघांची ओळख झाली होती. चित्रपटामध्ये अलका कुबल लक्ष्मीकांत बेर्डेच्या पत्नी होत्या. पण ते रुहीच्या प्रेमात पडले. रुहीने मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील काम केले आहे.

त्यांचे पहिले लग्न रुही बेर्डेसोबत झाले होते. पण काहीच वर्षे दोघांचा संसार टिकला. अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत लक्ष्मीकांत यांनी दुसरे लग्न केले. या जोडीने अनेक मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. तसेच हिंदी चित्रपटातसुद्धा हे दोघे एकत्र झळकले होते.

अभिनय आणि स्वानंदी ही प्रिया-लक्ष्मीकांत यांच्या मुलांची नावे आहेत. अभिनयने ती सध्या काय करते या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. तर धाकटी मुलगी स्वानंदी 17 वर्षांची असून सध्या तिचे महाविद्यालयीन शिक्षण सुरु आहे.

पहिली पत्नी रुही बेर्डेंचा यशात मोठा वाटा:- एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत आणि रुही यांच्याविषयी सांगितले होते की लक्ष्मीकांत यांच्या यशात सर्वोत मोठा वाटा हा रुही बेर्डेंचा होता. जेव्हा लक्ष्मीकांत प्रसिद्ध नव्हेत त्याकाळात रुही यांनी त्यांना साथ दिली होती.

लक्ष्मीकांत यांनी करिअरची सुरुवात छोट्या रंगभूमीवर केली होती. लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय आधीपासूनच लक्षवेधक होता. सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा नेहमी सहभाग असत.

अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतचे लक्ष्मीकांत यांचे नाते कमालीचे घट्ट होते. लक्ष्मीकांत बेर्डे खूप शिस्तप्रिय होते. रात्री कितीही उशीरा झोपले तरी सकाळी वेळेत ते सेटवर हजर असायचे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.