लग्नाच्या ७ वर्षानंतर ऐश्वर्याने केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘या एका’ चित्रपटामुळे अभिषेक बच्चनसोबत करावे लागले लग्न….

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि जागतिक सौंदर्यवती बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बॉलीवूडच्या परफेक्ट जोडप्यांपैकी एक आहे. 20 एप्रिल 2007 रोजी दोघांनी लग्न केले. आज दोघांच्या लग्नाची अनेव्हर्सरी आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्याचा यांच्या प्रेमाचा किस्सा सेटवरूनच सुरू झाला हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. आणि अभिषेकनेदेखील ऐश्वर्याला चित्रपटाच्या सेटवर प्रपोज केले होते.
ऐश्वर्या सांगते, अभिषेक त्याच्या नात्यात खरा आणि अस्सल असतो. त्याने मला ज्या मार्गाने प्रपोज केले ते अचानक, अत्यंत भयानक होते. नक्कीच आम्ही मौल्यवान हिऱ्याची अंगठी खरेदी करू शकतो. पण आम्हाला त्याची गरज आहे का? जरी गुरू चित्रपट धीरूभाई अंबानी यांच्यावर असला तरी, या चित्रपटानेच या दोन तार्यांना जवळ आणले.
ऐश-अभिषेकची भेट 1997 ला ‘प्यार हो गया’ या चित्रपटादरम्यान झाली होती. या चित्रपटात ऐश-अभिषेकचा चांगला मित्र बॉबी देओलसोबत काम करत होता.
अभिषेकने नंतर ऐश्वर्याबरोबर ‘धाई अक्षर प्रेम के’ (2000) आणि ‘कुछ ना कहो’ (2003) मध्ये काम केले. पण गुरु हा चित्रपट होता जिथून या दोघांचे सूर जुळले. ‘कजरारे’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांची बॉन्डिंग अधिक बळकट झाल्याचा दावा अनेक माध्यमांद्वारे केला जात आहे.
पण खरं तर 2006 ते 2007 दरम्यान तीन चित्रपटांच्या (उमराव जान, गुरू, धूम 2) च्या शूटिंगदरम्यान या जोडप्याला एकमेकांसमवेत वेळ घालवण्याची संधी मिळाली आणि दोघांमध्ये प्रेम वाढलं. आणि पुढे प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं आज ते दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप सुखी आहेत.