लग्न न करता आई बनली होती ही अभिनेत्री, आता सुधारू इच्छिते ही चूक…!

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी खूप संघर्ष करून आपली कारकीर्द घडवली आहे,अशा अनेक कथा आपण ऐकल्या असतीलच. अलीकडेच एका ज्येष्ठ अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात आलेल्या संघर्षाची की कथा उलगडली आहे. आणि हि कथा ऐकून सर्वात आश्चर्यचकित झाले आहे.
ही अभिनेत्री स्ट्रॉंग लेडी आणि सिंगल वुमन म्हणून ओळखली जाते. आपण कुणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला लक्षात आलेच असेल, होय अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याबद्दल. नीना गुप्ता यांनी त्या काळात लग्न न करता आई बनण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. यामुळे वाईट परिणामांना सामोरे जावे लागले होते.

नीना गुप्ता यांनी त्यांचे फिल्मी करीअर मालिकेद्वारे सुरु केले. नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या. पण त्यांची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या बोल्ड निर्णयामुळे.
त्यावेळी नीना गुप्ता यांनी घेतलेल्या त्या निर्णयामुळे प्रचंड झाली. यामुळेच त्यांना असंख्य लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. पण यासर्व गोष्टींचा विचार न करता नीना आपल्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिल्या. त्यांचा निर्णय होता वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटु विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा. त्यावेळी त्यांचा हा निर्णय खूप क्रांतिकारक होता.
साठीच्या वयातही नीना गुप्ता आज तितक्याच बोल्ड आहे, आजही त्या आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात. माझ्या बोल्ड फोटोवर खूप कमेंट येतात आणि मी त्या एन्जॉय करते असे देखील नीना गुप्ता म्हणाल्या.