लिफ्टमध्ये शाहिद आणि सैफसोबत अडकल्यावर काय करणार? करिनाचं उत्तर ऐकून पत्रकारही झाले चकित….

करिना कपूर बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींपैकी आहे जी आपल्या अॅक्टिंगसोबतच फॅशन स्टेटमेंट आणि आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखली जाते. अभिनयाव्यतिरिक्त आपल्या अप्रतिम स्टाइलसाठीही ओळखली जाते. बॉलिवूडमधील फॅशनेबल आणि स्टायलिस्ट अभिनेत्रींच्या यादीमध्ये करीनाचं नाव टॉपला असते.
पण आपल्याला माहित असेल की तिचं शाहिदसोबतच अ-फेअरही लग्नाआधी जोरदार चर्चेत होतं. करीना आणि शाहीदची पहिली भेट ‘फिदा’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. शाहीदला पाहून करीना एवढी इम्प्रेस झाली होती की तिनेच शाहीदला प्रपोज केले होते. करीनाने स्वतः काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ही बाब मान्य केली होती पण आजही तिच्या अ=फेअरची चर्चा सुरु असते.
लग्नापूर्वी करीना आणि सैफ लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यानंतर 5 वर्षांच्या नात्यानंतर ते लग्नात बंधनात बांधले गेले. सैफसोबत लग्न झाल्यावर शाहिदची चर्चा मागे पडली. एकदा शाहिद आणि सैफबाबत करिनाने एका मुलाखतीत असं उत्तर दिलं होतं की, जे ऐकून संपूर्ण इव्हेंटमधील प्रेक्षक हैराण झाले होते.
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करिनाला त्याने एक अजब जर-तरचा प्रश्न विचारला होता. करिनाला या शोमध्ये विचारण्यात आलं होतं की, जर लिफ्टमध्ये तू तुझा एक्स बॉयफ्रेन्ड शाहिद कपूर आणि पती सैफ अली खानसोबत अडकली तर तिचं रिऍक्शन काय असेल?
आता या प्रश्नावर बिनधास्त करिनाने तसंच बिनधास्त उत्तर दिलं:-
बेबोने जराही वेळ न घालवता उत्तर दिलं की, हे खूपच मजेदार होईल. या दोघांनी सुद्धा सोबत रंगूनसारख्या चांगल्या सिनेमात काम केलंय आणि दोघांचं एकमेकांसोबत चांगलं पटतही होतं. मी असा विचार करेन की, रंगून सिनेमात मी त्यांची हिरोईन का झाली नाही? आता बेबोचं हे उत्तर ऐकून करण जोहर सुद्धा खूपच हैराण झाला.
पण हे उत्तर करिनाने गंमतीत दिले होते हे नंतर तिने बोलून दाखवले.पण तिने असे बोलून शाहिद आजही तितकाच आवडतो हे नकळत दाखवून दिले. आपल्याला कदाचित माहित पण असेल की करिना कपूर आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. मात्र, यादरम्यानही ती तिचं शूटिंगच काम संपवण्याच्या मागे लागली आहे.
नुकतंच तिने आमीर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं. तसेच तिने सांगितले की, ती तैमूर पोटात असताना जाहिरातींच्या शूटींगमध्ये बिझी होती तर आता यावेळी ती सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. ती नुकतीच सिनेमाचं शूटींग पूर्ण करून आता मुंबईत परतली आहे.