वयाचे 30 वर्ष पूर्ण करूनही “बॉय-फ्रेंड” शिवाय फिरताय या अभिनेत्रीं, इतक्या “सौंदर्यवती” असून देखील या कारणामुळे आहेत अविवाहित

मनोरंजन
बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्या खुपच सुंदर आहेत त्या लवकरच लग्न देखील करत असतात. बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आपले पटापट लग्न उरकून टाकले आहे. परंतु बॉलिवूडमध्ये अजूनही अशा बऱ्याचशा अभिनेत्री आहे त्यांचे अजूनही लग्न झालेले नाही. या अभिनेत्री आपल्या करिअरवर जरा जास्तच फोकस करत असतात त्यामुळे त्यांना लग्न करायला देखील वेळ मिळत नाही ना प्रेम करायला.
अनुष्का शेट्टी चा जन्म सात नोव्हेंबर रोजी झाला होता आता अनुष्का अडतीस वर्षांची असून ती अजूनही सिंगल आहे. हो तिचे अजूनही लग्न झालेले नाही. इतक्या सुंदर दिसणाऱ्या या अभिनेत्रीचा कोणीही बॉय-फ्रेंड सुद्धा नाहीये. साऊथ चित्रपट सृष्टीमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
2. काजल अग्रवाल :- तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हटले तरी चालेल अशी अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल. काजल अग्रवाल हिने साऊथ चित्रपट सृष्टी मध्ये खूपच धूम उडवली आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये आपला कसदार अभिनय साकारला असून आपल्या सौंदर्याने बर्याच तरुणांना घायाळ केले आहे. काजल अग्रवाल चा जन्म 19 जानेवारीला झाला होता. काजल चे वय आता 34 वर्ष इतके झाले आहे. परंतु काजल अग्रवाल अजूनही सिंगलच आहे. म्हणजेच काजल ने अजूनही कुणाशी लग्न केलेले नाही तिचा कोणीही बॉयफ्रेंड देखील नाहीये.
3. भूमी पेडणेकर :- भूमी एक बॉलिवुडची खूपच सुंदर अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने पहिल्यांदा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते ते ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटाद्वारे. या चित्रपटात तिने खूपच दमदार अभिनय साकारला होता म्हणून या चित्रपटामुळे तिला झी अवार्ड सुद्धा मिळाला होता.
नुकताच आलेला ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटांमध्ये भूमी पेडणेकर दिसली होती. भूमीने टॉयलेट एक प्रेम कथा, बाला, सांड की आख, अशा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. भुमी पेडणेकर अजूनही अविवाहित आहे.
4. नित्या मेनन :- नित्या मेनन या अभिनेत्री चा जन्म आठ एप्रिल रोजी बेंगलोर मध्ये झाला होता. नित्या मेनन आपल्या दमदार अभिनयामुळे आणि आपल्या सुंदरते मुळे खूपच चर्चेत असते. नित्याने अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. जसे की तमिळ, तेलुग, मल्याळम, हिंदी इत्यादी.तिने अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्यासोबत मिशन मंगल या चित्रपटामध्ये एक सुंदर भूमिका निभावली होती जी लोकांना आवडली देखील होती. नित्या मेनन हिचे वय 32 वर्षे एवढे झाले असून तिने अजूनही लग्न केलेले नाही.
5. तापसी पन्नू :- तापसी पन्नू चा जन्म एक ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये झाला होता. तापसी ने हिंदी, मल्याळम, तमिळ भाषांचा चित्रपटांमध्ये काम केले आहे. खुपच जबरदस्त आणि दमदार अभिनयामुळे तापसी पन्नू बऱ्याचशा चित्रपटांमध्ये पाहिली गेली आहे. तिने हिंदी चित्रपटा सोबतच बऱ्याचशा मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.
तिचा सांड की आख हा हिंदीतील चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला होता. तापसी पन्नू हिचे सोशल मीडियावर खूपच चाहते आहेत. ती आपल्या चाहत्यांना नवनवीन फोटो शेअर करत असते. तिचे वय 32 वर्ष एवढे असून सुंदर दिसणाऱ्या तापसी ने अजूनही लग्न केलेले नाही.