वयाच्या २३ व्या वर्षी २० हजार करोड संपत्तीचा मालक आहे ‘हा’ मुलगा, आहे ‘या’ राज घराण्याचा वंशज..

वयाच्या २३ व्या वर्षी २० हजार करोड संपत्तीचा मालक आहे ‘हा’ मुलगा, आहे ‘या’ राज घराण्याचा वंशज..

आता राजा-महाराजा हे शब्द क्वचितच कुठेतरी कानी पडतात. राजांचे राज्य गेले, आणि लोकशाही आली. मात्र तरीही या अनेक ठिकाणी, आपल्या पूर्वजांचे राज्य सांभाळण्यात काहीना यश आले आहे. सुरवातीच्या काळात, राजा एक हाती सत्ता सांभाळत होते. मात्र, आता लोकशाहीचे राज्य आहे.

तरीही, अनेक ठिकाणी काही राजे, आपला मुलुख सांभाळताना आपल्याला बघायला मिळते. काही गोष्टी र’क्तातच असतात, असे म्हणायला हरकत नाही. आपल्या पूर्वजांचे शाही थाट आणि शौर्य त्यांचे वंशज घेऊनच जन्माला येतात. आजही अनेक वंशज, आपले शाही थाट आणि आपली परंपरा जपून आहेत.

शाही कुटुंबातील महाराजा असून देखील, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा पद्मनाभ सिंह यांच्यामध्ये देखील आहे. त्यामुळेच ते अनेक मोठाल्या ब्रँडसाठी मॉडलिंग देखील करतात. सोबतच ते एक उत्तम पोलो खेळाडू देखील आहेत. त्यांना नवीन जागी जायला खूप आवडते. वेगवेगळ्या देशात जाऊन, वेगवेगळी नवीन ठिकाणे शोधून तिथे राहणे पद्मनाभ यांना खूप आवडते.

अनेक वेळा सर्वसाधारण लोकांप्रमाणे ते वेगवेगळ्या देशात जाऊन फिरतात आणि तिथे राहतात. ट्रॅव्हलिंग मध्येच त्यांचा जास्त पैसा खर्च होतो, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. पद्मनाभ सिंह यांचे जयपूरच्या राम-निवास महलमध्ये स्वतःचा खाजगी एक आलिशान अपार्टमेंट देखील आहे. या अपार्टमेंटमध्ये सर्व प्रकारच्या लक्झरी सुविधा उपलब्ध आहेत.

यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वस्तू, जगातील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी आणलेल्या आहेत. असं सांगितलं जातं की, त्या अपार्टमेंटचे इंटेरियर, क’रोडो रु’पयाची आहे. बेडरूम, ड्रेसिंग रूम, प्रायव्हेट डायनिंग रूम, किचन, स्विमिंग पूल या सर्वांवरती चांगलाच खर्च करण्यात आलेला आहे. शिवाय त्यासाठी वापरलेल्या सर्व वस्तू खर्चिक आणि महागडे आहेत.

पद्मनाभ सिंह यांना लक्झरी कार खूप जास्त आवडतात. त्यांच्याकडे जगातील महागड्या आणि एक्सक्लुझिव्ह कारचे कलेक्शन आहे. सोबतच अनेक विंटेज कार देखील त्यांच्या पार्किंगमध्ये आहेत. या कार नेहमीच त्यांच्या मॅन्शनचे सौंदर्य वाढवतात, असे त्यांचे मत आहे. महाराजा पद्मनाभ सिंह यांची अशी आलिशान लाइफस्टाइल बघून सर्वांच्या मनात प्रश्न असेल की, त्यांची किती मोठी संपत्ती आहे. पूर्वजांपासून मिळालेली संपत्ती आणि काही नवीन प्रोजेक्ट असे सर्व मिळून बदनाम सिंह यांच्या नावे तब्बल 20 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *