विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नात सहभागी होणार ‘हे’ बॉलिवूड कलाकार? पण सलमान मात्र..

विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नात सहभागी होणार ‘हे’ बॉलिवूड कलाकार? पण सलमान मात्र..

Entertainment

विकी कौशल आणि कतरिना कैफ आजकाल त्यांच्या चित्रपटांपेक्षा लग्नासाठी जास्त चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार,दोघेही पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. कतरिना-विकी दोघंही कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये शाही विवाहसोहळा पार पाडणार आहेत. आतापर्यंत दोघांच्या लग्नाच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत.

विकी-कतरिना त्यांच्या लग्न आणि लव्ह लाईफबद्दल मौन बाळगत असतील, परंतु ते कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत हा खास दिवस खास बनवणार असल्याचं अनेक रिपोर्ट्समधून समोर येत आहे. या खास लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची यादी समोर आली आहे, ज्यामध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. 7 ते 12 डिसेंबर हा दरम्यान लग्नसोहळा चालणार आहे. लग्नासाठी हॉटेलमध्ये बुकिंगसुद्धा झालं आहे. मात्र, त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. व्हीआयपी वेडिंग्ज आयोजित करण्यासाठी अनेक इव्हेंट कंपन्या एकत्र काम करत आहेत. या सर्व बातम्यांच्या दरम्यान, एक यादी समोर आली आहे, जी दोघांच्या या हाय-प्रोफाइल डेस्टिनेशन वेडिंगमध्ये सामील होणार आहेत.

‘या’ बॉलिवूड कलाकारांची असणार उपस्थिती-

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सचा समावेश आहे. या यादीत करण जोहर, अली अब्बास जफर, कबीर खान मिनी माथूर, रोहित शेट्टी, रुमर्ड जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी, वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल या सर्वांचा लग्नात समावेश असणार असं म्हटलं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना आणि विकीचा रोका दोघांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत झाल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपट निर्माते कबीर खान यांच्या घरी दिवाळीच्या दिवशी हा रोका झाला आहे असंही समोर येत आहे. मात्र अजूनही विकी किंवा कतरिनाकडून याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा झाली नाही.

चित्रपट आणि टीव्ही क्रू, त्यांच्या लग्नाच्या तारखांच्या अगदी जवळ शूटिंग करत आहेत, त्यांना भाड्याच्या वाहनांचा तुटवडा जाणवत आहे कारण कॅटरिना आणि विकीच्या लग्नासाठी बहुतेक SUV आणि हाय-एंड कार आधीच बुक केल्या गेल्या आहेत. जे पाहुण्यांना विमानतळापासून हॉटेलपर्यंत पिक-अप आणि ड्रॉपची सुविधा देईल. त्यासाठी त्यांच्या मित्रांनी आणि व्यवस्थापकांनी मोठ्या प्रमाणात भाड्याने कार बुक केली आहे.

दरम्यान, बॉलिवूडची ही दिग्गज मंडळी या कपलच्या लग्नाला हजेरी लावत असताना सलमान खान मात्र जाणार नसल्याचं बोललं जात आहे. कतरिनासोबत टायगर हा सिनेमा करत असताना बऱ्याचदा या जोडीला एकत्र पाहण्यात आलं, पण शुटींगवरुन मुंबईत परतल्यानंतर दोघेही एकत्र दिसले नाहीत. दरम्यान सलमान टायगर सिनेमाच्या पुढील शुटींगसाठी पुन्हा परदेशात जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे तो कतरिनाचा लग्न सोहळा अटेंड करु शकणार नसल्याची चर्चा रंगते आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *