विदेशात करत होती ‘न्यूज रिपोर्टर’च काम, पण भाग्य बदलल्यामुळे आज आहे मोठी बॉलिवूड स्टार…

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर परदेशातही खूप प्रसिद्ध आहे. सध्या जॅकलिन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कारण बॉलिवूड मध्ये येण्याआधी जॅकलिन फर्नांडिस न्यूज रिपोर्टरचे काम करत होती. जाणून घेऊ तिचा प्रवास..
जॅकलिनने शिक्षण पूर्ण केल्यावर श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरवात केली. श्रीलंकेमधील नोकरी सोडल्यानंतर जॅकलिनला मॉडेलिंगची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर 2006 साली जॅकलिनला मिस युनिव्हर्स श्रीलंका ही पदवी मिळाली.