विराट कोहलीला BCCI ने दिला झटका! रोहित शर्माकडे सोपविले ‘वन-डे’चे कर्णधारपद, विराटला ती गोष्ट पडली महागात..

virat kohli जगभरात रनमशीन म्हणून ओळखले जाते. मात्र माघील काही दिवसांपासून त्याचा खराब फॉर्म सुरु आहे. ज्या बॅटमधून कोणत्याही बॉलवर धडाधड धावा होत असे, सध्या ती बॅट शांत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विराटाचे चाहते त्याच्यावर चांगलेच नाराज आहेत. सोबतच BCCI देखील त्यांच्यावर नाराज असल्याचे संकेत अनेकवेळा मिळाले होते.
आणि म्हणूनच काही दिवसांपूर्वी, त्याने टी-20 विश्वचषकाचे कर्णधारपद सोडले होते. पण असे असले तरीही, तो स्वत: वनडेचे कर्णधारपद सोडण्यास तयार नव्हता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची घोषणा त्यामुळे लांबणीवर पडली होती. मात्र आता BCCIने विराटच्या बाबतीत चांगलाच कठोर निर्णय घेतला आहे. आता विराट कोहलीच्या जागी हिटमॅन रोहित शर्माकडे rohit sharma भारतीय क्रिकेट संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.
Team India ने विराटच्या नेतृत्वाखाली 19 पैकी 15 एकदिवसीय द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. सतत बायो बबलमध्ये राहणे आणि तिन्ही फॉरमॅटचे कर्णधार बनणे सोपे नाहीये. सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर अनेकवेळा स्वतः Virat kohliने हे सांगितले आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे व संघाचे नेतृत्व करणे हे एक मोठे आव्हान आहे. त्याचा परिणाम माघील बऱ्याच दिवसांपासून विराट कोहलीच्या फलंदाजीवरसुद्धा बघायला मिळाला.
विराट कोहलीला गेल्या 2 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सुद्धा शतक झळकावता आलेले नाही. तर दुसरीकडे रोहितचा खेळ दिवसेंदिवस चांगलाच उंचावला आहे. रोहितने आतापर्यंत 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी आठ सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे, तर दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल आहे. जानेवारी 2017 मध्ये एम एस धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर ODI संघाच्या कर्णधारपदाची धूरा Vira kohli च्या हातात दिली होती. आता विराट कडून कर्णधारपद काढून घेण्याचे वेगवेगळे तर्क आणि कारण मीडियामध्ये दिले जात आहेत. यातील खरे कारण काय हे अजूनही समोर आले नाही. मात्र, संघातील हा फेरबदल, आता तरी संघाला अधिक यश मिळवून देतील अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे.