शिवसेनेची स्कीम ; कल्याण-डोंबिवलीकरांना अवघ्या ५० रु प्रति लिटर ने मिळत आहे पेट्रोल! जाणून घ्या काय आहे प्रकरण…

शिवसेनेची स्कीम ; कल्याण-डोंबिवलीकरांना अवघ्या ५० रु प्रति लिटर ने मिळत आहे पेट्रोल! जाणून घ्या काय आहे प्रकरण…

वेगवेगळे राजकीय पक्ष, सतत प्रकाश झोतात राहण्यासाठी काही ना काही शक्कल लढवतच असतात. कधी गरिबांची मदत करतात, कधी कोणी गरजूना अन्न पुरवठा करतात, कधी औषध पुरवठा करतात तर कधी कोणी काही गिफ्ट्स देतात, आणि सगळेच याची जाहिरात देखील करतात. राजकीय पक्ष सामाजिक कार्य करतात आणि त्याची उत्तम जाहिरात देखील करतात.

साहजिकच त्यामुळेच तर त्यांना प्रसिद्धी मिळते. त्यात जर कोणाचा वाढदिवस, किंवा लग्नाचा वाढदिवस, पक्षाचा वर्धापन दिवस असे काही खास दिवस असतील तर हे राजकीय पक्ष अजूनच वेगवेगळी शक्कल लढवतात. कधी कोणी आपल्या आवडत्या नेत्याच्या वजनाची मिठाई किंवा धान्य वाटप करतात.

सकाळी १० वाजता सुरु झालेला हा उपक्रम रात्री १२ पर्यंत सुरु राहणार आहे असे सांगण्यात आले आहे. राज्याचे युवा नेतृत्व आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आज ३१ व वाढदिवस आहे. हिंदुहृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांचा लाडका नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस नेहमीच हटके स्टाईल मध्ये साजरा करण्यात येतो.

कधी युवा संवाद, तर कधी आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन त्यांचे खास संबोधन अश्या अनेक उपक्रमांमध्ये आदित्य ठाकरे राज्यामधील युवकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यातच त्यांच्या जनदिवसाची धूम सगळीकडेच पाहायला मिळते. शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वावर समाधानी आणि खुश आहेत.

राज्यभरात अनेक वेगवेगळे उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आले असले तरीही म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली भागात राबवलेला हा उपक्रम चांगलाच खर्चिक आहे असे दिसून येत आहे. सकाळी १० वाजता या उपक्रमाला सुरुवात झाली असून दुपारी १२ पर्यंत प्रत्येक एका माणसाला एक लिटर पेट्रोल चक्क १ रुपयांना देण्यात आले आहे.

यामध्ये वाढत्या पेट्रोल च्या किमती बघता हा उपक्रम तेथील रहिवास्यांसाठी चांगलाच फायद्याचा ठरला हे मात्र नक्की. आंबेरनाथ येथे देखील शिवसेनेचे नेते अरविंद वाळेकर यांनी पेट्रोल कमी दरात देण्याचा उपक्रम राबवला.

१०२ रुपये प्रतिलिटर ने मिळत असलेले पेट्रोल ५० रुपये दराने मिळाले म्हणून, आदित्य ठाकरे यांना नक्कीच भरगोस शुभेच्छा या जन्मदिवसाच्या निमित्त भेटल्या असणार. परंतु आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्तच्या या उपक्रमात शिवसेनाचा चांगलाच खर्च झाला असेल हे नक्की.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.