‘शेरशाह’नंतर योद्धाच्या भूमिकेत दिसणार सिद्धार्थ मल्होत्रा, चित्रपटाचा टिझर बघून अंगावर येईल काटा ! पहा Video..

‘शेरशाह’नंतर योद्धाच्या भूमिकेत दिसणार सिद्धार्थ मल्होत्रा, चित्रपटाचा टिझर बघून अंगावर येईल काटा ! पहा Video..

Entertainment

बॉलीवूडमध्ये स्टार-किड्स ची आणि त्यांच्या आगामी चित्रपटांची चर्चा होणे अगदी साधारण आहे. मात्र, आपल्या बळावर जे सुपरस्टार बनतात, जेव्हा त्यांच्या चित्रपटांची चर्चा सुरु तेव्हा नक्कीच काही तरी वेगळे आणि खास होते. सिद्धार्थ मल्होत्रा अशाच काही मोजक्या स्टार्स पैकी आहे. करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमामधून बॉलीवूडमध्ये जबरदस्त एंट्री घेतली.

या सिनेमाने मात्र नवीन विक्रमाची नोंद केली. कारगिल युद्धातील खरा हिरो, मेजर विक्रम बत्राची भूमिका त्याने रेखाटली होती. यामध्ये त्याने आपल्या कामाची काहीच कसूर सोडली नाही. त्याचे काम बघून, काही क्षण खरोखर आपण मेजर विक्रम बत्रालाच बघत आहोत काय असं अनेकांना वाटत होते. या सिनेमाने त्याचे बुडत चाललेले करियर पुन्हा नव्याने सुरु केले.

आता हाच सिद्धार्थ मल्होत्रा एका नव्या लूकमध्ये दिसणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या अंतर्गत ‘योद्धा’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे टिझर स्वतः करण जोहरने ट्विट करून शेअर केले आहे. योद्धा हा पावरफूल, ऍक्शन सिनेमा असणार आहे. त्याच्या टीझरमध्ये एक नवेपणा बघायला मिळाला. यामध्ये एका पडणाऱ्या विमानामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, गन घेऊन उभा आहे.

अनेकांना हा टिझर बघून अंगावर काटा आला. हा टिझर शेअर करत करन जोहरने लिहले आहे की,’मी अत्यंत आनंदाने तुमच्यासाठी एक ऍक्शनने परिपूर्ण अशी सिरीज घेऊन येत आहे. योद्धा बघून नक्कीच तुम्हाला हॉलीवूडच्या अनेक ऍक्शन सिनेमाचा विसर पडेल. योद्धा एक फ्रेंचाइझी असणार आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा याच दिग्दर्शन करत आहेत.

यामध्ये तुम्हाला खूप कमी नवीन आणि खास बघायला मिळेल हे नक्की. ११ नोव्हेंबर २०२२रोजी तुमच्या भेटीला योद्धा येत आहे.’ २०२२ मध्ये अर्थात, त्याला आता पूर्ण एक वर्ष बाकी आहे. पण आतापासूनच ‘योद्धा’बद्दलचीही उत्सुकता बघायला मिळत आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा, थँक गॉड सिनेमामध्ये झळकणार आहे. सोबतच रोहित शेट्टीच्या आगामी वेब-सिरीजमध्ये देखील तो काम करणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.