सलमानखान सोबत असलं काम करू इच्छिते ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली सलमानसोबत काम करण्यास वाटेल ते करायला तयार आहे.

बिग बॉस या रियालिटी शो बद्दल बहुतेक सर्वांनाच माहित असेल. हा शो असा असतो की या शोमध्ये एक घर असते ज्याला बिग बॉसचे घर असे म्हटले जाते व या घरांमध्ये काही स्पर्धक पाठवले जातात, हे स्पर्धक बरेचसे अभिनेते-अभिनेत्री, टीव्ही कलाकार देखील असतात व यांना वेगवेगळे टास्क दिले जातात.
त्यांना हे दिलेले टास्क कम्प्लेट करायचे असते. हा शो बघायला बरेच जण उत्सुक असतात. मोठ्या आवडीने या शो साठी चाहते टीव्ही समोर बसून असतात. दर आठवड्याला एक स्पर्धक घराबाहेर येतो व शेवटपर्यंत पर्यंत जो स्पर्धक घरात टिकतो तो या शो चा विनर म्हणून घोषित केला जातो.
दिसायला एखाद्या हिरॉईनपेक्षाही सुंदर आणि ग्लॅमरस आहेत. उ-त्कृस्ट अभिनयाची छाप तिने चाहत्यांवर टाकली आहे. काही दिवसांपूर्वी ती शोमधून बाहेर पडली आहे ती बिग बॉस शो चे होस्ट व बॉलिवूडमधील एक दिग्गज कलाकार सलमान खान ची खूपच मोठी फॅन आहे असे ती सांगते.
बिग बॉस’च्या घरातून प्रत्येक वेळी एक एक स्पर्धक बाहेर जात असतो. परंतु चौदाव्या सीजन मधून सर्वात प्रथम बाहेर जाणारी स्पर्धक म्हणजेच सारा गुरपाल ही आहे. हो सारा गुरुपाल पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून ती बाहेर पडली.
यावेळी साराने असे सांगितले की मी सलमान खानची खूप मोठी चाहती आहे व मला जर कोणी सांगितले कि तू सलमान खान बरोबर एखादा चित्रपटात काम कर तर मी आनंदाने वेडी होऊन जाईल असे सारा सांगते. सारा गुरपाल एक पंजाबी गायिका आहे.
सारा सांगते की बिग बॉस सारख्या मोठ्या रियालिटी शोमध्ये मला जाण्याची संधी मिळाली, हे केवळ शक्य झाले ते म्हणजे पंजाबी एंटरटेनमेंट इंडस्ट्री मुळे असे सारा सांगते. ती असे सांगते की मी आज जिथे आहे ते केवळ पंजाब मुळेच त्यामुळे पंजाब माझ्यासाठी नेहमी क्रमांक एक वर राहील.
लोक मला याच कारणामुळे ओळखतात की मी पंजाबी गायिका आहे त्यामुळे मला याचा खूप गर्व आहे असे सारा सांगते. बिग बॉस च्या सीजन 14 मध्ये प्रत्येक आठवड्याला “विकेंड चा वार” म्हणून एक शो असतो ज्यामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये खेळलेल्या टास्क वर स्पर्धकांचे घरात राहणे किंवा बाहेर जाणे हे ठरवले जाते. पहिल्याच आठवड्यात साराला घराबाहेर पडावे लागले आहे.