‘सलमानशी लग्नं करणं माझं स्वप्न होतं, म्हणून 16 व्या वर्षी मुंबईला आले, पण सलमानने सलग 8 वर्ष माझा वापर करून…

‘सलमानशी लग्नं करणं माझं स्वप्न होतं, म्हणून 16 व्या वर्षी  मुंबईला आले, पण सलमानने सलग 8 वर्ष माझा वापर करून…

बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या आतापर्यत किती ग’र्लफ्रें’ड झाल्या असतील हे कदाचित त्यालाही माहित नसेल. त्याच्या व्यवसायिक आयुष्यासोबतच त्याच्या खाजगी आयुष्याची नेहमीच चर्चा केली जाते. सलमानचा उद्या म्हणजेच २७ डिसेंबरला वाढदिवस आहे.

सलमानने वयाची पन्नासी ओलांडली असली तरी त्याने अद्याप लग्न केलेले नाही. सलमान लग्न कधी करणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडलेला असतो. सलमानला देखील अनेक मुलाखतींमध्ये याविषयी विचारले जाते. काही वेळा सलमान यावर उडवाउडवीची उत्तरं देतो तर काहीवेळा तो या प्रश्नावर स्वतःचीच टर उ’डवताना दिसतो. सलमानने आजवर लग्न केले नसले तरी अनेक अभिनेत्रींसोबत त्याच्या नात्याची मीडियात चर्चा झाली आहे.

आणि तिचे बॉलिवूडमध्ये येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सलमान खान हे होते. होय, सलमानवर लहानपणापासूनच सोमीचे क्रश होते. ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमानसोबतच लग्न करायचे, असे तिने ठरवले होते. सोमीचा कल बघून तिच्या आईने तिला मुंबईला पाठवले. पण सोमीला बॉलिवूडपेक्षाही सलमान हवा होता. खरे सांगायचे तर सलमानचा पिच्छा करत करतच ती फ्लोरिडावरून मुंबईत पोहोचली होती. यावेळी ती केवळ आणि केवळ १६ वर्षांची होती. अशा या लहान वयात ती मायानगरी मुंबईला एकटी आली होती.

मुंबईत आल्या आल्या तिने मॉडेलिंग सुरू केले आणि मग बॉलिवूडमध्ये संधी शोधत राहिली आणि कदाचित हीच ती संधी होती, ज्याद्वारे ती सलमानपर्यंत पोहोचू शकणार होती. अखेर तिची ही इच्छा पूर्ण झाली आणि चित्रपटात काम करत असताना एक दिवस ती सलमानला भेटली.

एका मुलाखतीत सोमीने हा सगळा प्रवास सांगितला होता. सलमान माझा पहिला बॉ’यफ्रेन्ड होता. त्याच्यासाठीच मी बॉलिवूडमध्ये आली आणि त्याच्याकडून मी खूप काही शिकले. आज मी जे काही आहे, ते त्याच्याचमुळे, असेही ती म्हणाली होती.

सलमान आणि सोमी आठ वर्षे रि’लेशनशि’पमध्ये होते. सोमीने १९९१ ते १९९७ या काळात सुमारे दहा चित्रपटात काम केले. १९९९ मध्ये तिचे आणि सलमानचे ब्रे’कअप झाले. याचे कारण होते, ऐश्वर्या राय. या ब्रे’कअपनंतर सोमीने बॉलिवूड सोडले आणि ती पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही.

यानंतर २०११ मध्ये ती सलमानला भेटली होती. तिनेच याबद्दल सांगितले होते. २०११ मध्ये मी सलमानला भेटले होते. त्यावेळी मी बँकॉकमध्ये होते. सलमानही एका शूटींगसाठी येथे आला होता. तिथे आम्ही भेटलो. आता आम्ही आपआपल्या आयुष्यात खूप पुढे गेलो आहोत, असे तिने सांगितले होते.

सलमानसोबत ब्रे’कअप झाल्यानंतर सोमी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी फ्लोरिडाला परतली. येथे तिने सायकॉलॉजीचे शिक्षण घेतले. यानंतर मियामी युनिव्हर्सिटीतून जर्नालिझम केले. यादरम्यान डॉक्युमेंट्री बनवण्यात तिला रस वाटू लागला. पुढे तिने न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकेडमीत प्रवेश घेतला.

त्यानंतर सोमीने महिलांच्या आयुष्यावर काही लघुपट बनवले. २००६ मध्ये तिने महिलांच्या अधिकारांसाठी काम करायला सुरुवात केली आणि नो मोअर टीअर्स नावाची संस्था स्थापन केली. वयाच्या पाचव्या वर्षी सोमीवर लैं’गि’क अ’त्याचा’र झाला होता. हेच ही संस्था सुरू करण्यामागचे खरे कारण होते. आता सोमी जगभरातील म’हिलांच्या अ’धिकारांसाठी काम करते. सोमीच्या या संस्थेचे हजारो सदस्य आहेत. सोमी कदाचित आजही सलमानवर तेवढेच प्रेम करते. म्हणूनच आजपर्यंत ती अविवाहित आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *