साऊथ सुपरस्टार धनुष ‘या’ कारणामुळे अडचणीत, कोर्टाने दिली ४८ तासांची मुदत….!

सुपरस्टार रजनीकांतचे जगभरात करोडो चाहते आहेत. रजनीकांतचा सिनेमा बघण्यासाठी लोकं, कित्येक तास रांगेत उभं राहून तिकीट घेतात. त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. गेली कित्येक दशकं तो, साऊथच्या चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. केवळ साऊथच नाही तर संपूर्ण जगात, रजनीकांत यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
रजनीकांत यांनी सुरुवातीपासूनच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, आपल्या चाहत्यांना जवळपास सर्वच सांगितलं आहे. सुरुवातीला एक तिकीट कंडक्टर म्हणून काम करणारे शिवाजी गायकवाड, आज मोठया संघर्ष आणि मेहनतीने रजनीकांत बनला. जिद्द आणि मेहनत करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर नशीब साथ देतेच, हे रजनीकांत यांनी दाखवून दिले आहे.
मात्र त्यानंतर त्याने हिंदी सिनेमा केले नाही. ३ या सिनेमासाठी त्याने गायलेलं ‘कोलावेरी डी’ या गाण्याने, इंटरनेटचे अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले होते. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या धनुष सध्या मात्र चांगल्याच वा’दाच्या भोवऱ्यात अ’डकला आहे. धनुषला महागड्या गाड्यांची भलती आवड आहे. तो नेहमीच भारीच्या आणि खास गाड्या देशातून आणि परदेशातून खरेदी करतच असतो.
मात्र त्याच हेच प्रेम त्याला आता अजूनच महागात पडेल असे वाटत आहे. २०१५ मध्ये त्याने युके मधून रोल्स रॉयल गाडी खरेदी केली होती. त्यावर कर सूट मिळावी अशी याचिका देखील त्याने दाखल केली होती. मात्र, त्याच्या वकिलांना आता हीच याचिका माघे घ्यायची आहे. पण कोर्टाकडून त्यासाठी त्यांना अनुमती मिळाली नाही आणि आता प्रकरण चांगलंच वाढलं आहे.
दरम्यान, या गाडीचा अर्धा कर ५ ऑगस्ट रोजी धनुषने भरला आहे. आणि उर्वरित कर भरण्यासाठी कोर्टाने त्याला ८ ऑगस्ट पर्यंतची तारीख दिली आहे. दरम्यान ३०.३० लाख एवढा भला-मोठा कर त्याला ८ ऑगस्ट पर्यंत भरावा लागणार आहे. नाही तर त्याच्यावर सक्तीची कारवाई करण्याचे संकेत न्यायमूर्ती एस एस सुब्रमण्यम यांनी दिले आहेत.
या देशात कोणतीही वस्तू खरेदी करताना सामान्य व्यक्ती कर भारतोच मग त्यासाठी इतर कोणाला सूट का मिळावी, तूर्तास लवकरात लवकर धनुष कर भरणारच असल्याचं त्याच्या वकिलांनी स्पष्टीकरण दिल आहे.