सुशांतच्या आ त्म ह त्या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून बिहार मधील जनतेने केले असे काही, बघून त्यांचा अभिमान वाटेल

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*ला एक महिना झाला आहे. अजूनही त्याच्या निधनाबद्दल असणाऱ्या निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. काही लोक आहेत जे या घटनेला आ*त्म*ह*त्या मानायला तयारच नाहीत. अनेक लोक असे आहेत जे अद्यापही CBI चौकशीची मागणी करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे. आता राजकीय लोकही या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करताना दिसत आहेत.
राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच या प्रकरणी पत्र लिहिलं आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिनंही सीबीआय चौकशीची मागणी केली होती. रियानं तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना टॅग करत पोस्ट शेअर केली होती आणि सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी म्हणून लागले होर्डिंग्ज, फोटो व्हायरल pic.twitter.com/oFrtQb6Dkk
— TimePass (@TimePassTalks) July 27, 2020
खास बात अशी की, सुशांतच्या दिल बेचारा या शेवटच्या सिनेमानंतर असं चित्र दिसत असून हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेकांनी या होर्डिंगचे फोटो शेअरही केले आहेत. बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्येला एक महिन्याहून जास्त काळ झाला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्येप्रकरणी अद्यापही मुंबई पोलीस तपास करत आहेत.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी म्हणून लागले होर्डिंग्ज, फोटो व्हायरल #SushantTruthNow #SushantSinghRajpoot @itsSSR pic.twitter.com/72Qhy6bOU5
— TimePass (@TimePassTalks) July 27, 2020
आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात जवळपास 35 पेक्षा जास्त लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा, सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी, बॉलिवूड डायरेक्टर संजय लीली भन्साळी, यश राज फिल्म्स कास्टींग डायरेक्टर शानू शर्मा यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी रेश्मा शेट्टीचीही चौकशी केली. रेश्मा सलमानची खानची एक्स मॅनेजर राहिली आहे. नुकतीच अशी माहिती समोर आली आहे की, यासाठी आता ब्रांदा पोलिसांनी डायरेक्टर महेश भट यांना चौकशीसाठी बोलावलं होतं आणि त्यांचीही चौकशी झाली आहे.