सुशांतच्या सीएने केला धक्कादायक खुलासा; म्हणे, त्याच्या खात्यात 17 कोटी नाही तर….

गेल्या महिन्यात सुशांत सिंग राजपूत ने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. आता या घटनेला जवळपास दीड महिना झाला असला तरी यावर नवनवीन खुलासा होतच आहे. आधी यामध्ये नेपोटीझममुळे सुशांत चा बळी गेल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अशातच आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत च्या वडिलांनी त्याची कथित प्रियसी रिया चक्रवर्ती विरोधात पाटणा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
सीएने सांगितले की, सुशांतच्या लाईफस्टाईलनुसार त्याचा खर्चही होता. तो एक फिल्म स्टार होता. त्यामुळे रेंट, ट्रॅव्हल आणि शॉपिंगवर खर्च होता. गेल्या वर्षी सुशांतचे उत्पन्न घटले होते. सीएनने जानेवारी 2019 ते जून 2020 पर्यंत सुशांतने केलेल्या खर्चाचा तपशीलही दिला.
त्यानुसार, 2 कोटी रूपये कोटक महिंद्रामध्ये टर्म डिपॉझिट, 3.87 लाख रूपये रेंट, 61 लाख रूपये केडब्ल्यूएला, 26.40 लाख फार्म हाऊसचा रेंट, 4.87 लाख रूपये एकत्र प्रवास, 50 लाख फॉरेन टूर, 2.5 कोटी आसाम ते केरळ टूर, 9 लाख डोनेशन असे ट्रान्जेक्शन झाले.