सुश्मिता सेनच्या मुलांवर पतीऐवजी बॉयफ्रेंड रोहमन शॉलने सांगितला हक्क…म्हणाला ही मुले माझीच आहेत., कारण मीच त्यादिवशी…

बॉलिवूड स्टार सुष्मिता सेन हिनं 1994 मध्ये युनिव्हर्सचा किताबा जिंकला होता. हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बनली. 21 मे 2020 म्हणजेच आज तिनं हा किताब जिंकून 26 वर्षे पूर्ण झाली आहेत.
पण आज सुद्धा ती तितकीच चर्चेत असते. अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल याच्यामुळे तर सदैव चर्चेत असते आणि त्याला कारण देखील तसेच शिवाय रोहमन शॉलने काही दिवसांपूर्वीच एक ख’ळब’ळजनक खुलासा केला आहे. चला तर जाणून घेऊ कि त्याने कोणता असा ख’ळब’ळजनक खुलासा केला आहे.
रोहमन म्हणाला, “मी मूळचा काश्मीरचा आहे पण माझा जन्म नैनितालचा आहे. नैनितालमध्ये शालेय शिक्षण आणि डेहराडूनमध्ये इंजिनीअरिंग केलं आणि मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात मॉडलिंग सुरू केल. त्यानंतर सहा वर्षांनी मी मुंबईत आलो आणि मुंबईत आल्यानंतर दोन वर्षांनी मला सुष्मिता भेटली व त्यानंतर माझं आयुष्यच बदललं.
“मी खूप नशीबवान आहे की मी आज सुष्मितासोबत आहे. सुष्मिता फक्त एक व्यक्ती नाही तर एक आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगणारी एक उत्तम व्यक्ती आहे. तिला समजून घ्यायला थोडा वेळ लागतो पण एकदा तुम्ही तिला ओळखलं तर त्यापेक्षा चांगला अनुभव कोणताच नाही. ती खूप प्रेमळ आहे, तिचे विचारही चांगले आहेत आणि मी तर तिच्यावर एक पुस्तक लिहू शकतो”, असं त्यानं सांगितलं.
सुष्मिताशी लग्न करण्याबाबत तो म्हणाला, “मी सुष्मिता आणि तिच्या मुली रेने, एलिशा एका कुटुंबाप्रमाणे राहतो. मी या मुलींचा बाबा आहे आणि त्यांचा एक मित्रही आहे. एका सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणेच आम्ही भां’डतो आणि मजामस्तीही करतो. राहिला प्रश्न लग्नाचा तर आम्ही त्याबाबत फारसा विचार करत नाही.
आमच्या कुटुंबाकडूनही द’बाव नाही. हो, पण लग्न करू तेव्हा लपवणार नाही”. मुलाखतीत रोहमननं त्याच्या आणि सुश्मिताच्या वयात असणाऱ्या अंतरावरही भाष्य केलं. तो म्हणाला, आमच्या दोघांच्या वयात १५ वर्षांचं अंतर आहे. सुरुवातीला मी माझ्या कुटुंबापासून सुश्मितासोबतचं माझं नातं लपवलं होतं.
त्यांना सोशल मीडियामुळे आमच्या नात्याबद्दल समजलं. पण माझ्या फॅमिलीमध्ये सर्वच समजदार आहेत. त्यामुळे माझ्या या निर्णयात ते माझ्या पाठिंशी खंबीरपणे उभे राहिले. पुरुषांना नेहमीच मॅच्युरिटी हवी असते. कारण ते कोणत्याच वयात पूर्णपणे मॅच्युअर नसतात. जेव्हा एक खंबीर स्त्री तुमच्या आयुष्यात येते तेव्हा तुम्ही काहीही करण्यासाठी सक्षम होता.’