सैफच्या बेडरुममधील ‘या’ वाईट सवयीला वैतागली आहे करिना; म्हणाली, मी झोपलेली असतानाही तो मला…

फिल्म इंडस्ट्रीतील रॉयल कपल म्हणून करिना आणि सैफकडे पाहीले जाते. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. सैफ आणि करिनाच्या जोडीला त्यांचे फॅन्स खुप पसंत करतात. दोघांना फिल्म इंडस्ट्रीतील पावर कपल बोलले तर काही चुकीचे होणार नाही.
‘टशन’ चित्रपटाच्या दोघांची पहीली भेट झाली होती. त्यावेळी करिनाचे शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाले होते. तर सैफचा त्याची पत्नी अमृता सिंगसोबत घटस्फोट झाला होता. अशा परीस्थितीमध्ये या दोघांनी एकमेकांची साथ दिली आणि दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
करिना म्हणाली की, ‘सैफचे आणि माझे नेहमीच भांडण होत असतात. आमची भांडण झाल्यानंतर सैफ सर्वात पहीले माफी मागतो. कारण अनेकदा भांडण त्याच्या चुकीमूळे होत असतात. त्यामूळे भवतेक सॉरी तोच बोलतो. मी कधीच सॉरी बोलत नाही’.
पुढे करिना म्हणाली, ‘सैफची सर्वात वाईट सवय म्हणजे तो कोणत्याही गोष्टीला पहील्यांदा नकार देतो. त्यानंतर थोड्या वेळाने मला कॉल किंवा मॅसेज करुन तो होकार देतो. त्याच्या या सवयीमूळे माझी खुप चिडचिड होते. या गोष्टीवरुन आमची भांडण होत असतात’.
सैफबद्दल बोलताना करिना पुढे म्हणाली की, ‘सैफची अजून एक वाईट सवय म्हणजे तो रोज सकाळी मला लवकर उठवतो. त्याला जास्त वेळ झोपलेलं आवडत नाही. म्हणून तो मला जास्त वेळ झोपू देत नाही. सैफच्या या सवयीला मी कंटाळले आहे.’
बॉलीवूडचे सर्वात प्रसिद्ध कपल म्हणून या दोघांकडे पाहीले जाते. २०१४ मध्ये दोघांना तैमूर नावाचा मुलगा झाला होता. दोघेही आत्ता दुसऱ्यांदा आई वडील बनणार आहेत. गरोदरपणामूळे देखील करिना आणि सैफ सध्या खुप जास्त चर्चेत आहेत.