‘सैराट’ मधील लंगड्या आणि सल्याचा ‘फ्री हिट दणका’, अरबाज आणि तानाजी दिसणार पुन्हा एकत्र…

‘सैराट’ मधील लंगड्या आणि सल्याचा ‘फ्री हिट दणका’, अरबाज आणि तानाजी दिसणार पुन्हा एकत्र…

मराठी चित्रपट सैराट आजही सर्वाना आठवतच असेल. तसेच या चित्रपटातील पात्र देखील सर्वांना आठवतच असतील. सैराट चित्रपटातील आरची आणि परश्याची जोडी सर्वांच्या मनात आजही रुजून बसलेली आहे. विषेश करून तरुण तरुणींनी या चित्रपटाला चांगलेच उचलून धरले होते. तेव्हा या चित्रपटाने हिंदी सिनेमांना देखील टक्कर दिली होती.

सैराट चित्रपट पाहिल्यानंतर बऱ्याच तरुण आणि तरुणींनी या चित्रं पटाचे स्टोरी चे या अनूकरण करताना देखील आपण बघितले आहे. परश्या आणि आरची सोबत या चित्रपटात दुसरे अनेक सहकलाकार होतें. त्यांचा या चित्रपटातील अभिनय देखील दाद देण्यासारखा होता. सहकलाकारांपैकी सल्ल्या आणि लंगड्या हे दोन पात्र देखील आपणास चांगलेच ठाऊक असतील.

परंतु पुन्हा एकदा सल्या म्हणजेच खर नाव अरबाज आणि लंगड्या म्हणजेच तानाजी त्यांच्या मैत्रीची जादू दाखवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. सैराट चित्रपटात त्यांना पहिल्यांदाच मिळालेल्या या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर पुन्हा तानाजी आणि अरबाज कोणत्यातरी तरी चित्रपटातून दिसावे असे चाहत्यांचे मत होते.

परंतु ते दोघे परत कुठे दिसतील अंक कोणत्या चित्रपटातुन दिसतील याचा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. आणि प्रेक्षकांचे या प्रश्नाचे उत्तर शेवटी मिळाले आहे. याला उत्तर म्हणजे सुनिल मगरे दिग्दर्शित ‘फ्री हिट दणका’ हा चित्रपट आहे. मैत्रीची एक वेगळी परिभाषा मांडणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटातून सल्ल्या आणि लंगड्या यांना सैराट नंतर पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे.

देशातील लॉकडाउन नंतर पुन्हा एकदा चित्रपटसृष्टी जोमाने काम करू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘फ्री हिट दणका’ या नवीन चित्रपटाची घोषणा एस.जी.एम या चित्रपट निर्मिती संस्थेने केली आहे. चाहत्यांना पुन्हा एकदा मैत्रीची केमिस्ट्री या चित्रपटातून बघायला मिळणार आहे.

या चित्रपटाचे प्रोडक्शन मॅनेजर राजू दौलत जगताप तर संगीत बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी केले असून चित्रपटाचे छायाचित्रण वीरधवल पाटील करणार आहेत. या येणाऱ्या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन सुनिल मगरे यांनी केले आहे तर संजय नवगिरे हे या चित्रपटाचे संवाद, पटकथा आणि गीत लेखन करणार आहेत.

या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उमेश नरके, धर्मेंद्र सिंग, प्रसाद शेट्टी, विकास कांबळे, प्रवीण जाधव आणि दिग्दर्शक सुनिल मगरे सांभाळत असून सुधाकर लोखंडे हे या चित्रपटाचे सह निर्माता आहेत. आणि या चित्रपटातून सल्ल्या आणि लंगड्या पुन्हा त्यांचा अभिनय दाखविण्यास सज्ज झाले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.