‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मधील येसूबाई आता दिसणार ‘या’ नव्या मालिकेत

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्रं देखील अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय ठरले होते. या मालिकेत येसूबाईंचे पात्र हे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारले होते.
या मालिकेमुळे प्राजक्ता गायकवाडला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आणि याच मालिकेतून तिने तिच्या अभिनयाची छाप मराठी प्रेक्षकांच्या मनावर पाडली. आता प्राजक्ता लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती आर्या नामक मुलीची भूमिका साकारणार आहे.
आर्याचं एक पाऊल कशाप्रकारे तिचं आयुष्य बदलेल, तिच्या मदतीला काळुबाई कशी येईल हे सर्व पाहणं खूप मनोरंजक असणार आहे. ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.