हार्दिकचा चाहत्यांना मोठा धक्का ! लवकरच करणार निवृत्तीची घोषणा !

नुकतंच विराट कोहली (Virat Kohli)च्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीला काढून टाकण्यात आले आहे. रोहित शर्माला आता, भारतीय क्रिकेट संघाची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे विराट कोहलीचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. त्यातच आता क्रिकेटप्रेमींना अजून एक मोठा धक्का बसला आहे.
हार्दिक पांड्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीने केवळ त्याच्या चाहत्यांनाच नाही तर संपूर्ण भारतीय क्रिकेट वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडवली आहे. हार्दिक पांड्या कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा हार्दिक पांड्याने चर्चा रंगवली आहे. हार्दिक पांड्या लवकरच, क्रिकेटच्या एका फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे. याबद्दल समोर आलेल्या संपूर्ण माहितीनुसार, माघील बऱ्याच दिवसांपासून हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे.
हार्दिक पांड्याला 2019 मध्ये पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. या दुखापतीमुळे त्याला खूप त्रास झाला. तेव्हापासून पांड्याला पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करताच आलेली नाही. आणि याचाच त्याला चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. तो पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करू शकत नसल्यामुळे, आयपीएल 2021 आणि T20 विश्वचषकातील त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली.
गेल्या एका वर्षात हार्दिक पांड्याला ODI-T20 मध्ये एकूण 46 षटके टाकता आली. त्याची गोलंदाजी तेवढी मजबूत राहिली नाही. आणि त्यामुळेच हार्दिक पांड्या आता संघाबाहेर आहे. हार्दिक पंड्या सध्या त्याच्या फिटनेसवर काम करत आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार तो विजय हजारे ट्रॉफी देखील खेळणार नाहीये. पुढील दोन वर्षात टीम इंडियाला टी-20 आणि वनडे वर्ल्ड कप खेळायचा आहे. त्याच पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याकडे आता खूप कमी वेळ शिल्लक आहे. हार्दिक पुन्हा आपला फिटनेस मिळवू नाही शकला तर त्यामध्ये हार्दिक सोबतच टीम इंडियाचे देखील नुकसानच आहे.