हिंदू धर्मात असे केले जातात साधू-संतावर अंत्यसंस्कार.. गरुड पुराणानुसार साधू-संतांचा दे’ह जंगलात सोडून….

हिंदू धर्मात असे केले जातात साधू-संतावर अंत्यसंस्कार.. गरुड पुराणानुसार साधू-संतांचा दे’ह जंगलात सोडून….

संपूर्ण जगामध्ये, हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे. हिंदू धर्माला वेगळे आणि खास असे महत्व आहे. जन्म-मृत्यू याबद्दल अनेक वेगवेगळ्या गोष्टी, या धर्मामध्ये सांगितल्या आहेत. त्याबद्दल काही गोष्टींचे आजही सर्वजण पालन करतात. आपल्या धर्मामध्ये, प्रत्येक गोष्ट जी सांगितली आहे किंवा लिहून ठेवली आहे त्याला नक्कीच तर्क आहे.

ज्या जीवाचा जन्म झाला आहे, त्याचा मृ’त्यू निश्चित आहे. हे आपल्या धर्मामध्ये वारंवार सांगितले आहे. याला कोणीच अपवाद नाही. कित्येक देव दैवतांनी, वेगवेगळे अवतार घेतले आहेत. मात्र असे असले तरीही, त्यांच्या मृ’त्यू देखील झालेला आपल्या धर्मामध्ये सांगितले आहे. त्यामुळेच मृ’त्यू या एका प्रमुख अशा टप्प्याला कोणीच अपवाद नाही, हे आपल्या धर्मामध्ये प्रखरपणे समजावून सांगितले आहे.

हिंदू धर्मामधील साधू संतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणते मार्ग आहेत? इतर धर्मांमध्ये धर्मिक गुरुवरती कशाप्रकारे अंत्यसंस्कार होतात, याबद्दल अनेक वेळा प्रश्न पडतात. त्याबद्दलच आपण बघूया, संत परंपरेमध्ये त्यांच्या पंथानुसार त्यांचे अंतिम संस्कार केले जातात. वैष्णव संतांवर, प्रामुख्याने अग्निसंस्कारच केले जातात. परंतु संन्यासी परंपरेमधील संतांवर अंत्यसंस्कार करण्याचे तीन प्रकार आहेत.

वैदिक पद्धतीने केले जाणारे अंत्यसंस्कार हा त्यामधील एक प्रमुख प्रकार आहे. त्याचसोबत जलस’माधी आणि भूमी-स’माधी हे देखील दोन प्रकार आहेत. बऱ्याच वेळा, संन्याशाच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांचा मृ’तदे’ह जंगलात सोडण्याची देखील पद्धत आहे. वृंदावन येथील मुख्य संत देव्रहा बाबा यांना, जलस’माधी देण्यात आली होती.

त्यांच्यासोबत इतर अनेक संतांवरही याच पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बाबा जय गुरुदेव यांच्यावर अग्निसंस्कारद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. परंतु त्यावरून देखील वा’द पे’टला होता. बाबांच्या इच्छेनुसार, त्यांच्यावर वैदिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात असल्याचे जयगुरुदेव आश्रमातील प्रमुख अनुयायांनी सांगितले होते.

रामायण,महाभारत आणि इतर हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये संतांना जलसमाधी देण्याचाच उल्लेख आहे. संन्यासी परंपरेत, जलसमाधी आणि भूमी स’माधी देण्याची पद्धत प्रथा आहे. मात्र वैष्णवांमध्ये याआधी अनेक मोठाल्या संतांवर अग्निसंस्कार केले गेले आहेत. पूर्वी साधूंना जलसमा’धी दिली जात असे. यामुळे, नदीप्रदूषण होण्याचा मुद्दा काहींनी धरून ठेवला होता.

त्यामुळे आता समाधी देण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. प्रयागराज मधील महंत नरेंद्र गिरी यांची पूजा केल्यानंतर, त्यांच्या गुरूंच्या समाधीच्या शेजारीच त्यांनाही भूसमाधी देण्यात आली. भूसमाधीमध्ये साधूंना समाधीच्या स्थितीत बसवून निरोप दिला जातो. ज्या आसनांमध्ये ते बसलेले असतात त्याला, सिद्ध योगाची मुद्रा ,असे म्हणलं जातं.

महंत नरेंद्र गिरी यांना देखील, अशाचप्रकारे समा’धी दिली गेली. अघोरी साधु जि’वंत असतानाच स्वतःवर अंत्यसंस्कार करतात. अ’घोरी साधू बनण्याच्या प्रक्रियेत, प्रथम स्वतःचे अंत्यसंस्कार करावे लागतात. अघो’री साधु कुटुंबापासून पूर्णपणे दूर राहून संपूर्ण ब्रह्मचार्य पाळतात, व त्यावेळी ते आपल्या संपूर्ण कुटुंबाचा त्याग करण्याची प्रतिज्ञा देखील घेतात.

अंत्यसंस्कार झाल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि संपूर्ण जगासाठी देखील मृ’तच असतात. मुस्लीम धर्मातल्या, धार्मिक व्यक्तीचा मृ’तदे’ह झो’पून द’फन केला जातो. ख्रिश्चन धर्मामध्ये पाद्री,बिशप आणि इतर धार्मिक व्यक्तींच्या मृ’तदे’हाची आधी मिरवणूक काढण्यात येते, आणि त्यानंतर त्यांना द’फन केलं जातं. तर, पारशी धर्मामध्ये ,धार्मिक गुरूचा मृ’तदे’ह त्यांच्या धर्मातल्या प्रथेप्रमाणे एका विशेष छतावर ठेवला जातो, त्याठिकाणी गिधाड आणि गरुड येऊन त्यांचे श’रीर खा’तात.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *