‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबेडीत ! पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का..

मनोरंजन
सध्या सगळीकडेच लगीनघाई सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये, तर अनेक कपल लवकरच लग्न बेडीत अडकणार आहेत. कटरीना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. आता या चर्चेला अजूनच उधाण आले आहे. लवकरच हे दोघे लग्नबेडीत अ’डकणार असून, त्यांच्या घरी सर्व तयारी देखील सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
अशीच लगीनघाई मराठी चित्रपटसृष्टी मध्ये देखील बघायला मिळत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील, एक लाडकी अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे. महेश कोठारे यांच्या ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेत चोपडाई आईच्या भूमिकेत झळकलेली, सई कल्याणकर लवकरच लग्न करणार आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी, सई कल्याणकरचा साखरपुडा पार पडला.
साखरपुड्यातील काही फोटोज इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले होते. सईने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अभिनेता अंकुश चौधरी सोबत ‘झक्कास’ या चित्रपटात देखील तिने काम केले होते. झी युवा वाहिनी वरील ‘फ्रेशर्स’, कलर्स मराठी वरील ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘भेटी लागे जीवा’ यासारख्या मालिकांमध्ये देखील सई कल्याणकरने काम केले आहे.
सई कल्याणकरने अनेक नाटकांमध्ये देखील काम केले आहे. अथर्व थेटरच्या ‘आम्ही पाचपुते’ या नाटकातील तिची भूमिका रसिकांना खास आवडली होती. केवळ अभिनयातच नाही तर क्लासिकल नृत्यामध्ये देखील, सई पारंगत आहे. भरतनाट्यममध्ये तिने विशारद प्राप्त केली आहे. स्टार प्रवाह वरील सुपरहिट मालिका ‘तुझे नी माझे घर श्रीमंताचं’ यात देखील ती झळकली होती.
प्रशांत शिवराम चव्हाण सोबत काही दिवसांपूर्वीच सई कल्याणकरने गुपचूप साखरपुडा उरकून घेतला होता. साखरपुडा झाल्यानंतर तिने आपल्या चाहत्यांसोबत काही फोटो देखील शेअर केले होते. त्या फोटोंवर भरभरून लाईक्स आले होते आणि तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या होत्या. सईचा होणारा नवरा, प्रशांत चव्हाण हा एक मोठा डॉक्टर आहे.
नॅनो केमिस्ट्री विषयातून त्यांनी पीएचडी केलेले आहे. यामध्ये विशेष म्हणजे सई आणि प्रशांत या दोघांचे लग्न अरेंज मॅरेज आहे. साखरपुड्याच्या सोहळ्यात दोन्ही कुटुंबीयांनी मोजक्याच मित्रमंडळींना आमंत्रण दिले होते. शिवाय दोघे लग्न देखील अशाच स्वरूपात करणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप लग्नाची तारीख जाहीर झालेली नसली तरीही, येत्या काही दिवसातच ते दोघे लग्नगाठ बांधणार असल्याचे दिसून येत आहे.