‘या’ 8 बॉलिवूड सेलिब्रेटींना नाही कोणतेही अपत्य, नंबर ‘8’ ची होती सलमानची गर्लफ्रेंड…

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेत्री व अभिनेते आहेत. म्हणजे ज्यांनी चित्रपट सृष्टीतील एक अभिनेता किंवा अभिनेत्री आपला जीवनसाथी बनवला आहे. दिलीप कुमार सायराबानो असो किंवा जावेद अख्तर शबाना आझमी, तर किशोर कुमार मधुबाला असो सर्वांनी आपल्या आवडत्या जोडीदारासोबत लग्न केले आहे.
त्यांना आपला जोडीदार हा बॉलीवूडच्या चित्रपटसृष्टीतच मिळाला आहे. परंतु त्यांच्यामध्ये असे काही कपल्स आहेत ज्यांना अजूनही एकही संतानप्राप्ती झालेली नाही. आणि जे पण आहे ते त्यांच्या पहिल्या लग्ना पासूनच आहे.
2) मीनाकुमारी – कमाल अमरोही – कमाल अमरोही हे त्यांच्या काळातील एक नावाजलेले डायरेक्टर होते आणि मीनाकुमारी तर सर्वांना माहीतच आहे सिल्वर स्क्रीन वरील स्ट्रेटर्जी क्वीन म्हणून ओळखली जाणारी मीना कुमारी ने अनेकांच्या हृदयात घर केले होते.
मीनाकुमारी व कमाल अमरोही यांना एका चित्रपटाच्या सेटवर एकमेकांशी प्रेम झाले. कमाल हे मीनाकुमारी यांच्यापासून पंधरा वर्षांनी मोठे होते आणि अगोदरपासूनच विवाहित देखील होते. तसेच त्यांना मुले देखील होते. त्यांनी लग्न करताना अशी अट घातली होती की लग्ना नंतर एकही संतानप्राप्ती करणार नाही.
3) साधना – आर के नैय्यर – बॉलिवूडमध्ये एक नावाजलेली जोडी म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे साधना व आर के नैय्यर यांची. दोघांनी 1966 मध्ये लग्न केले होते. साधना त्यावेळी आपल्या करिअरच्या सर्वात सोनेरी काळातून प्रवास करत होती.
कारण त्यावेळी तिचे अनेक चित्रपट लोकप्रिय ठरत होते. तसेच नैय्यर साहेब देखील त्या काळातील एक खूप मोठे दिग्दर्शक होते. दोघांमध्ये खूप प्रेम होते परंतु काही कारणास्तव त्यांना संतान सुख मिळाले नाही.
4) आशा भोसले – आरडी बर्मन – खूपच नावाजलेली गायिका आशा भोसले व संगीत दिग्दर्शक आरडी बर्मन यांना सर्व लोक प्रेमाने पंचमदा असे म्हणतात. आशा भोसले व आर डी बर्मन हे असे सेलिब्रिटी कपल आहे त्यांना देखील संतान सुख मिळालेले नाही.
आशा जी यांचे पहिले लग्न हे गणपतराव भोसले यांच्याशी झाला होता. यांच्यापासून त्यांना तीन मुले देखील आहेत परंतु लग्नाच्या 11 वर्षानंतर दोघे वेगळे झाले. 1980 मध्ये आशा यांनी पंचमदा यांच्याशी लग्न केले त्यांनी दोघांच्या सहमती वरून म्युझिक वर फोकस करण्याचा निर्णय घेतला.
5) मधुबाला – किशोर कुमार – मुमताज जहान दहलवी उर्फ मधुबाला बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती. अनेकांच्या काळजामध्ये तिने घर करून ठेवले होते. अनेक जण तिच्या सौंदर्याचे दीवाने झाले होते तर दुसरीकडे किशोर कुमार यांनी देखील अनेक लोकांच्या काळजात घर केले होते ते ही आपल्या मधुर आवाजात द्वारे.
मधुबाला व किशोर कुमार दोघांनीही रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. किशोर कुमार यांना आगोदर पासूनच एक मुलगा होता जो त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झलेला होता. मधुबाला याना एक आजार झाला ज्यामुळे डॉक्टरांनी त्यांना प्रगणेंसी विषयी विचार करण्यास नाही सांगितले.
6) शबाना आझमी-जावेद अख्तर – जावेद अख्तरने 1972 मध्ये अभिनेत्री हनी इराणीशी प्रथम लग्न केले होते आणि त्यांना फरहान आणि झोया अशी दोन मुले होती. काही वर्षानंतर दोघे वेगळे झाले आणि जावेद साहबने शबाना आझमीशी लग्न केले. शबाना दोघांनाही आपले मूल मानते. दोघेही आपल्या करियरमध्ये व्यस्त होते, त्यामुळे मुलांचा विचार नव्हता.
7) अनुपम खेर-किरण खेर – अनुपम खेर आणि किरणची 80 च्या दशकात चंदीगडमध्ये भेट झाली, जिथे ते थिएटरचा भाग होते. किरणचे लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा अलेक्झांडर देखील होता, परंतु तिचे पतीबरोबरचे संबंध चांगले नव्हते, म्हणून किरण त्याच्यापासून विभक्त झाली आणि अनुपम खेरशी लग्न केले आणि दोघेही मुंबईला आले. दोघांनाही त्यांची मुले हवी होती, परंतु वैद्यकीय परिस्थितीमुळे त्यांनी मुले होऊ न देण्याचा निर्णय घेतला. सिकंदरने अनुपम खेर यांचे आडनाव ठेवले आहे.
8) संगीता बिजलानी – मोहम्मद अझरुद्दीन – 90 च्या दशकात जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा मोहम्मद अझरुद्दीन भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार होता आणि संगीता एक यशस्वी मॉडेल आणि अभिनेत्री होती. अझरुद्दीनने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि दोघांनी 1996 मध्ये लग्न केले. मागील विवाहापासून अझरला दोन मुले आहेत, परंतु संगीता आणि अझर यांना मूल नाही.