४७ वर्षाच्या उर्मिला मातोंडकरला ‘अँटी’ बोलणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले ‘चोख’ उत्तर, म्हणाली; तुमच्या….

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कालच तिचा ४७ वा वाढदिवस साजरा केला आहे. उर्मिला मातोंडकरचे म्हणणे आहे की जेव्हा लोक मला आँ’टी म्हणून ट्रो’ल करतात तेव्हा माझ्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. ती म्हणाली की, मी तुम्हाला हात जोडून सांगू इच्छिते की जर तुम्ही मला या माध्यमातून त्रास देणार असाल तर मला त्याने अजिबात काहीसुद्धा त्रा’स होणार नाही.
मी विचार करते की वाढत्या वयासोबत आपल्या जीवनात खूप काही बदल झाले आहेत आणि हे साहजिकच आहे त्यामुळे मला लोक कधी काय म्हणतात याचा काही सुद्धा फरक पडत नाही. उर्मिला मातोंडकर म्हणाली की, जीवनात काळासोबत जे लोक चांगल्या गोष्टी शिकत नाहीत, ते त्याच्या आयुष्यात काही सुद्धा करू शकत नाहीत.
ती म्हणाली की, माझे संगोपन असे झाले आहे की मी वाढदिवसा सारख्या गोष्टींमुळे जास्त उत्साही नाही होत. ती पुढे म्हणाली की, या ऐवजी मी दुसऱ्यांच्या वाढदिवसाला जास्त उत्साही असते आणि त्यांच्यासाठी काही प्लान करत असते. बालपणापासून मी आणि माझ्या भावाच्या मनात समाजासाठी काही तरी करण्याची भावना राहिली आहे.
त्यामुळे वाढदिवसादिवशी काही दान करण्याची माझी परंपरा आधीपासूनच चालत आली आहे. महाराष्ट्रातील बाबा आमटे यांच्या आनंदवन सारख्या संस्थांना आम्ही यावेळी काही डोनेट करत असतो. कारण आपल्यापेक्षा त्या लोकांना अधिक याची गरज आहे.
बालपणी वाढदिवसासारख्या गोष्टी होत्या, मात्र चित्रपटसृष्टीत आल्यानंतर अशा गोष्टीना वेळ मिळाला नाही. दिवाळी, न्यू इअर आणि अशा दिवशी मी खूप काम केले आहे. पण आज माझ्यासाठी आनंदाची बाब आहे जेव्हा दुसरे लोक मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.
आणि माझी गाणी लावून माझ्या आठवणींना उजाळा देत असतात. उर्मिला मातोंडकर यांनी 1980 मध्ये मराठी ‘झाकोल’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. कलयुग हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. यानंतरही उर्मिला मातोंडकरने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.