अबब..! तब्बल शंभर कोटी मानधन घेऊन ‘हा’ बनला चित्रपट श्रुष्टीतील सर्वात महागडा अभिनेता..कोण आहे हा अभिनेता जाणून घ्या

अबब..! तब्बल शंभर कोटी मानधन घेऊन ‘हा’ बनला चित्रपट श्रुष्टीतील सर्वात महागडा अभिनेता..कोण आहे हा अभिनेता जाणून घ्या

बॉलीवूड मध्ये असे अनेक कलाकार आहेत की जे कोट्यवधी रुपये मानधन घेतात. यामध्ये अजय देवगन, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, अक्षय कुमार यासारख्या कलाकारांचा समावेश होतो. हे कलाकार जवळपास 70 80 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षापासून हा ट्रेंड आता बदलत आहे.

अनेक कलाकार आता स्वतःची निर्मिती सुद्धा करत आहे. तसेच चित्रपट तयार होताना त्यात आपला हिस्सा किती यावर देखील आधीच ठरवतात. त्यामुळे मानधनाचा अभिनेत्यांना काहीही फरक पडत नाही. गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडमध्ये जो अभिनेता चित्रपट करतो तो चित्रपटात 50 टक्के हिस्सा घेतो. त्यामुळे चित्रपट जरी फ्लॉप झाला तरी त्याला फायदा राहतो.

तसेच रजनीकांतचे चित्रपट ही ॲक्शन भरलेले असतात. दक्षिणेत सध्या विजय हा सुपरस्टार असून त्याचे आणि चित्रपट हिट असल्याचे पाहायला मिळते. रजनीकांत यांनी त्यांच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या दरबार या चित्रपटासाठी तब्बल 90 कोटी रुपये मानधन घेतले होते.. दक्षिण भारतामध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात येते.

यामध्ये अनेक मराठी अभिनेत्यांनी आपले नशीब आजमावले आहे. मराठीत एखादा कलाकार भेटला की दक्षिणेत तो पैसे कमवण्यासाठी जातो. अशोक सराफ यांच्यापासून अनेक कलाकारांनी दक्षिण आपले नशीब आजमावले आहे. सयाजी शिंदे यांनी तर दक्षिणमध्ये आपले नाव खूप कमावले आहे. असेच आणखी काही अभिनेते देखील दक्षिणेत चित्रपट करून वाहवा मिळवत आहेत.

विजय याने घेतले 100 कोटी रुपये

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सध्या विजय हा प्रसिद्ध लोकप्रिय कलाकार आहे. या अभिनेत्याचे सर्वच चित्रपट हिट होतात आणि तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. ज्याप्रमाणे रजनीकांतचा चाहतावर्ग आहे. त्याप्रमाणे विजय याचे देखील मोठे चाहते आहेत. अलीकडेच थलपती 65 या चित्रपटासाठी विजयने तब्बल शंभर कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तो सर्वात महागडा कलाकार ठरला असे देखील बोलले जात आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *